या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
करावे लागतील आणि खूप कालावधी लागेल. पहा तुम्ही काय करू शकता! मात्र ही मोठी हर्डल रेस आहे. सुदैवाने यशाची शक्यता आहे असा माझा अंदाज आहे.
पुण्याहून परतल्यावर एक मोठा लढा आणि प्रदीर्घकाळ चालवायची मोहीम असं समजून स्वत:च्या जीवनक्रमात बदल करून घेतला.
तिला शिक्षण देण्याचे ठरवल्यावरही अनेक प्रयोग उपक्रम सतत केले. यातून तिची तल्लख बुद्धी, चिकाटी याचे दर्शन घडत गेले आणि जिद्दीला बळकटी आली.
वल्लरी नेहमीच चांगल्या मार्गाने पास झाली. त्यासाठी तिने आणि आई वडील व आत्या यांनी घेतलेले कष्ट हे अपरंपार आहेत. ही प्रयत्नयात्रा प्रत्यक्षच वाचणे उचित ठरेल. समाजाला स्वत:च्या कृतीने आदर्श घालून देणारी ही कहाणी नुसती वाचावीच नव्हे तर संग्रही ठेवावी अशीच!
• फिटे अंधाराचे जाळे (अनुभव कथन)
लेखक - भालचंद्र करमरकर
प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे
प्रकाशन वर्ष - २00४
♦♦
वेचलेली फुले/११७