पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/128

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रकाशन व्यवसायावर क्ष किरण आहे नि अनेक मान्यवरांचा खरा चेहरा दाखवणारा आरसाही! चित्रकार एम्. एफ. हुसेन, एफ. एन्. सूझा, सतीश गुजराल, संपादक - पत्रकार खुशवंत सिंह, डॉम मोराएस, अभिनेते दिलीपकुमार, देव आनंद, आय. एस. जोहर, राष्ट्रपती झैलसिंह, सेलेब्रिटी शोभा डे, चित्रपट लेखक डॉमिनिक लॅपिएर आणि लॅरी कॉलिन्स, नोबेल विजेते दलाई लामा यांच्या रोचक आठवणींनी या पुस्तकाची पावणे चारशे पाने केव्हा भरून जातात समजत नाही. हे पुस्तक समजावतं लेखकांची लेखनाची असोशी, त्यांच्या लेखन तऱ्हा नि त्यांचा तऱ्हेवाईकपणाही! शिवाय हे पुस्तक सांगतं भारतीय प्रकाशन व्यवसाय कसा आहे? वाचकांना काय हवं असतं पुस्तकं कशी खपतात नि खपवली पण जातात? पाठ्यपुस्तकं, संदर्भ पुस्तकांचं जग कसं आहे? पुस्तकांचे खटले व त्यावरची बंदी. नवं ई-बुक मार्केट डिजिटल कसं होतंय, हे समजावून घेणं म्हणजे प्रकाशन विश्व आकाळणं!

 हे पुस्तक आपणास श्रीमंत, प्रसिद्ध माणसाचं नवं जग दाखवतं तसंच त्याचं पडद्याआडचं जीवन जगणं. 'संडे स्टैंडर्ड चे संपादक डॉम मोराएस 'मिसेस गांधी' नावाचं पुस्तक लिहितात व प्रकाशित पुस्तकाची पहिली प्रत स्वहस्ते इंदिरा गांधींना द्यायची म्हणून मोठ्या उमेदीने त्यांच्या निवासस्थानी दिल्लीला जातात तर इंदिरा गांधी 'पुस्तक? कसलं पुस्तक? मला नाही गरज त्याची. मी फालतू लिखाण वाचत नाही. घेऊन जा ते परत.' म्हणून त्यांची बोळवण करतात. हा असतो एका आणिबाणीतील एका पंतप्रधानांचा दर्प! संपादक कच्चे नसतात. ते आपले पुस्तक 'संडे' साप्ताहिकात क्रमशः प्रकाशित करतात. पुस्तकाची तडाखेबंद विक्री होते. चर्चा, समीक्षा सर्वत्र. हे वेगळे सांगायला नको की 'संडे'मध्ये आल्याने इंदिरा गांधींना वेळ काढून ते पुस्तक वाचणे भाग पडले.

 अशोक चोप्रा देव आनंदला आत्मकथा लिहिण्यास भरीस पाडतात. देव आनंदही झपाटून लिहितो. 'रोमान्स विथ द लाईफ'. पुस्तक पूर्ण झाल्यावर त्याला त्याची किंमत कळते. तो ते पुस्तक दुसऱ्या प्रकाशकास देतो. अर्थातच भरपूर पैसे घेऊन. गरोदरपणी गर्भपात हा प्रकाशन व्यवसायास येणारा वारंवार अनुभव.

 प्रख्यात उर्दू कादंबरीकार इस्मत चुगताई यांची कन्या रशदा. ती एम्. एफ्. हुसेनांची मैत्रीण. तिला एम. एफ. हुसेन यांच्या ठेवणीतल्या चिजा मिळतात. त्यातून अलौकिक कॉफीटेबल बुक आकारतं, 'इन कॉन्व्हर्सेशन

वाचावे असे काही/१२७