पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/127

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

रोचक आठवणींची पाने - अशोक चोप्रा.
अनुवाद - ज्योत्स्ना नेने
प्रकाशक - इंडस सोर्स बुक्स, मलबार हिल्स, मुंबई -४००००६, प्रकाशन - २०१७ पृ. ३७७, किंमत - रु.४२५/-


रोचक आठवणींची पाने

 पुस्तक प्रकाशक असतो कोण? लेखक आणि विक्रेता, वाचकांना जोडणारा दुवा की नवोदित, समीक्षक, वाचकांचा मार्गदर्शक? चतुर व्यापारी की धूर्त उद्योजक? त्याला कोणत्याही एका साच्यात आपणास खचितच बसवता येणार नाही. पण एकमात्र खरे की तो कल्पनेच्या जगात विचरणारा सौदागर असला तरी त्याचे पाय व्यवहाराच्या घट्ट पठारावर उभे असतात. प्रकाशकांचं स्वतःचं असं विश्व असतं, तसं प्रत्येक भाषेचं पण. त्यातही

इंग्रजी भाषेचं जग विचाराल तर अलिबाबाची गुहा, आकाशगंगा नि सप्तरंगी निसर्ग वैविध्य नि सौंदर्य! यात सतत चाळीस वर्षं इंबून राहणं म्हणजे रोज नव्या व्यक्ती, व्यवस्थांचं दर्शन. भारतीय इंग्रजी प्रकाशन जगतात विकास, हार्पर कॉलिन्स, हे हाउस, एशिया पब्लिशिंग, मेकॅनिकल इंडिया, इंडिया बुक्स या संस्थांत अशोक चोप्रा यांनी दीर्घकाळ व्यतीत केला. त्या काळात भेटलेले लेखक, कवी, गायक, चित्रकार, राजकारणी, धर्मप्रमुख, अभिनेते, सेनाधिकारी, मुत्सद्दी यांच्या आठवणींचं एक पुस्तक अशोक चोप्रांनी ते इंग्रजीत लिहिलं होतं. त्याचं नाव आहे, 'ए स्क्रॅप बुक ऑफ मेमरीज!' असं उपशीर्षक आहे, 'माय लाइफ विथ द रिच, द फेमस अँड द स्कँडल्स.' त्याचा मराठी अनुवाद केलाय ज्योत्स्ना नेने यांनी. हे पुस्तक भारतीय

वाचावे असे काही/१२६