पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/105

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


कागद आणि कॅनव्हास - अमृता प्रीतम भाषांतर - सुशील पगारिया क्रांती प्रकाशन, 'मनवृंदावन', ओंकारनगर, जळगाव. प्रकाशन - जुलै १९८५, पृष्ठे - ७६ किंमत - रु. ३०/- फक्त



कागद आणि कॅनव्हास

 भारतीय कवयित्री अमृता प्रीतम या सहस्रकातील श्रेष्ठ कवयित्री होत. पंजाबी काव्याच्या त्या विसाव्या शतकाच्या श्रेष्ठ कवयित्री म्हणून ओळखल्या जातात. भारतीय ज्ञानपीठाचे सन १९८१ ला प्रदान करण्यात आलेले पंजाबी भाषा व साहित्यासाठीचे पहिले पारितोषिक त्यांच्या 'कागज ते कैनवस' या काव्यसंग्रहास लाभले होते. तो त्यांचा प्रातिनिधिक काव्यसंग्रह मानण्यात येतो. या काव्यसंग्रहाचे मराठी भाषांतर जळगावच्या प्रख्यात कवयित्री सुशील पगारिया यांनी केलंय. तेही पदरमोड करून. या भाषांतराचे वैशिष्ट्य असे की अमृता प्रीतम यांनी ते वाचून मान्य केल्यानंतर प्रकाशित झाले आहे. त्यामुळे या भाषांतराची कवीगत अधिकृतता आहे. दुसरे असे की याचे मुखपृष्ठ अमृता प्रीतम यांचे आजीवन मित्र असलेले चित्रकार इमरोज यांनी मोठ्या आस्था व तत्परतेने तयार केले होते. 'कागद आणि कॅनव्हास' हे शीर्षकही प्रतीकात्मक आहे. कवयित्री आपली कविता उतरविते कागदावर तर चित्रकार आपलं चित्र उतरवतो ते कॅनव्हासवर. कॅनव्हास म्हणजे फ्रेमबद्ध कापड ज्यावर चित्रकार चित्र रेखाटतो. कागद म्हणजे अमृता प्रीतम तर कॅनव्हास म्हणजे चित्रकार मित्र इमरोज. यातील कविता दोघांच्या जीवनाच्या असल्या, तरी त्या स्त्री-पुरुष संबंधावर चिरंतन व चिरंजीवी भाष्य करतात,

वाचावे असे काही/१०४