पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/102

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

रवींद्रनाथ टागोर : समग्र जीवनदर्शन ग्रंथत्रयी १. भयशून्य चित्त जेथ... पृ. ४४२ किंमत - रु. ५००/- २. युगनिर्माता विश्वमानव पृ. ३४९ किंमत - रु. ७००/- ३. समग्र साहित्यदर्शन पृ. ३१० किंमत - रु. ५००/-  भाषांतरकार - डॉ. नरेंद्र जाधव  ग्रंथाली प्रकाशन, मुंबई. प्रकाशन - २०११


'रवींद्रनाथ टागोर : समग्र जीवनदर्शन ग्रंथत्रयी

 कवींद्र रवींद्रनाथ टागोर म्हणजे भारतीय साहित्याचे शिरोमणी! कवी, कथाकार, चिंतक, चित्रकार असं चतुरस्र व्यक्तिमत्त्व त्यांना लाभलं. त्यांच्या 'गीतांजली' काव्यसंग्रहास सन १९१३ चे नोबेल पारितोषिक मिळाले होते. त्यांची 'काबुलीवाला' बालकथा, पण तिच्यावरही चित्रपट निघाला. ते उत्कृष्ट चित्रकार होते. किती उत्कृष्ट? तर ते कथा, कविता, पत्रे लिहिताना खाडाखोड व्हायची. त्या खाडाखोडीचं पण ते चित्रात रूपांतर करत असत. महात्मा गांधींवर धाक होता फक्त रवींद्रनाथांचाच! राखीव मतदारसंघाच्या संदर्भात महात्मा गांधींनी आमरण उपोषण पुण्यात सुरू केले होते. त्यांची प्रकृती खालावली तरी ते उपोषण सोडण्यास तयार होईनात. सारे राष्ट्र चिंताक्रांत झालेले. रवींद्रनाथांनी महात्मा गांधींना पत्रात लिहिले, (खरे तर खडसावलेच) 'सत्याग्रह, उपोषणासारखी हत्यारं आपण सर्रास वापरू लागलो की त्याचे महत्त्व राहात नाही. शिवाय नैतिकतेचा धाक आपण एकाधिकार म्हणून वापरून समाजमनाची हिंसा तर करीत नाही ना? या प्रश्नाने गांधीजींना निरुत्तर केले नि उपोषण सुटले. अशा रवींद्रनाथ टागोरांची शतकोत्तर सुवर्ण जयंती सन २०११ मध्ये सर्वत्र साजरी होत होती. त्याचे औचित्य साधून समग्र रवींद्रनाथ मराठी वाचकांपुढे रवींद्रनाथांच्या कविता, पत्रे, लेख, निबंध,

वाचावे असे काही/१०१