पान:वाचन (Vachan).pdf/१७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अभिप्राय - ४ वाचनाचा पट उलगडणारा लघुग्रंथ : वाचन   डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या 'वाचन' या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच मॉरिशस येथील जागतिक हिंदी परिषदेत झाले. भाग्यश्री प्रकाशन या पुस्तकाचे प्रकाशक आहेत. जागतिक हिंदी परिषदेत मराठी पुस्तक प्रकाशित होणे दुर्मीळ योग! हा योग डॉ. लवटे यांच्या 'वाचन' या पुस्तकास लाभला. प्रकाशन सोहळ्यात अमराठी प्रमुख पाहुण्यांनी या पुस्तकातील उत्स्फूर्तपणे एका उता-याचे वाचन केले आणि तात्काळ उता-याचा संक्षेपाने अनुवादही केला. 'वाचन' या पुस्तकाच्या लेखनाचे हे प्राथमिक यश होते.  डॉ. सुनीलकुमार लवटे हे मराठी, हिंदी वाङ्मयाचे जेष्ठ लेखक म्हणून सुपरिचित आहेत. त्यांची लेखनाची भाषा अत्यंत प्रवाही व वाचकमनाला भिडणारी असते. वास्तव आणि संशोधनपर लेखनावर त्यांचा प्रमुख भर आहे. माणसाच्या दैनंदिन जीवनाला उपयोगी होईल, असा त्यांच्या लेखनाचा व व्याख्यानाचाही कल असतो. त्यांच्या अत्यंत पारदर्शी आणि सत्शील जगण्याचे प्रतिबिंब त्यांच्या लेखनात आणि वर्तनात दिसते. अल्पावधीत त्यांचे वाचन' हे पुस्तक वेगाने वाचकांपर्यंत जात आहे. केवळ १४१ पानांच्या या छोटेखानी पुस्तकात डॉ. लवटे यांनी वाचनाविषयीच्या त्यांच्या आठ-दहा वर्षांच्या चिंतनाचे सारच मांडले आहे. वाचनाच्या उत्पत्ती आणि प्रक्रियेचा स्पष्टपणे पट उलगडणारा लघुग्रंथ, असेच वर्णन या पुस्तकाचे करता येईल.  तुम्हास प्रगल्भ वाचक व्हायचे असेल तर वाचन' ग्रंथ वाचण्याशिवाय पर्याय नाही, असा ठाम विश्वास डॉ. लवटे आपल्या मनोगतात व्यक्त करतात.

तसेच अर्पण पत्रिकेत 'वाचन असोशी' हा शब्दप्रयोग वापरून डॉ. लवटे

वाचन १७१