तो या क्षेत्रात काम करणा-या सर्वांसाठी संग्राह्य झाला आहे. तिसरे परिशिष्ट वाचन सुभाषिते आहेत. चवथे परिशिष्ट सुनीलकुमार लवटे यांना वाचनप्रक्रियेविषयी सुचलेली एक दीर्घ कविताच
आहे. ही कविता वाचनाविषयी बरेच काही सांगून जाते. पाचवे परिशिष्ट
संदर्भसूचीचे आहे. या सर्व परिशिष्टांमधून वाचनाविषयी लेखकाने भरभरून
दिले आहे.
एकूणच हे पुस्तक भाषा, अभिव्यक्ती, लेखन, मुद्रण, मुद्रणसाहित्य,
ग्रंथ, ग्रंथालये आणि वाचन अशा अनेक विषयांना स्पर्श करते. ते मानवी
जीवनातील ‘वाचन' या क्रियेचे महत्त्व अधोरेखित करते. मानवाच्या जीवनात
वाचन ही क्रिया त्याला उन्नत करणारी ठरली आहे, हे निर्विवादास्पद आहे.
अशा वाचनप्रक्रियेची शास्त्रीय मांडणी हा या पुस्तकाचा मुख्य चर्चाविषय
आहे. वाचनसंस्कृती, अभिव्यक्ती आणि भाषावापराबाबत तीव्र संवेदनशील
बनलेल्या आजच्या काळात या पुस्तकाचे स्वागत अनेकार्थाने महत्त्वपूर्ण
आहे.
डॉ. नंदकुमार मोरे
मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
nandkumarmore@gmai1.com
Mob. 9422628300
साप्ताहिक साधना, पुणे
२० ऑक्टोबर, २०१८