पान:वनस्पतिविचार.pdf/234

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



२०८     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

य्याने पहिल्या जननतत्वापाशी येते. तेथे एकत्र आल्यावर त्यांचा परस्पर एकजीव होतो. दुसऱ्या जननतत्त्वास आकर्षण करण्यास पहिल्या अवयवांत सांखरेची सांठवण असते. निरनिराळ्या वनस्पतींमध्ये आकर्षक द्रव्ये वेगवेगळी असतात. मॅलिकआम्ल, पातळ डिंक, वगैरे द्रव्ये आकर्षक आहेत.

 फर्नहून उच्चवर्गीय स्थिति म्हणजे पुष्पवर्गाची होय. पैकी बहुदलवनस्पति हीं पुष्पविहित व संपुष्पवर्ग ह्यांची सांगड घालणारी मधली साखळी आहे. ह्या वर्गात जननेंद्रियें उच्चवर्गीय असून, कांहीं लक्षणांत पुष्पाविरहिताप्रमाणे त्यांची स्थिति असते. फर्नमध्ये पुरुषजननतत्व पाण्यातून स्वीतत्त्वाकडे जाऊन गर्भसंस्थापना होते. एकदल व द्विदलवनस्पति ह्यांहून वरच्या दर्जाच्या आहेत. त्यांत बीजोत्पादन नेहमी होऊन त्यांचेच योगाने वंशपरंपरा राखिली जाते. बीज दोन परस्पर भिन्नतत्त्वांचा मिलाफ होऊन तयार होते. ती तत्त्वें स्त्री व पुरुष असून त्यांचा संयोग म्हणजे गर्भधारणा होय. गर्भधारणा झाल्यावर बीजाण्डास बीजस्वरूप प्राप्त होते. गर्भधारणा होण्यापूर्वी स्त्री व पुरुषजननपेशी दोन्हीही आपआपल्यापरी संयोगासंबंधी तयारी करीत असतात. बीजाण्डांतील गर्भकोशांत केंद्रविभाग होऊन मुख्य गर्भाण्ड उत्पन्न होते, परागकण परागवाहिनीतून बीजाण्डांत शिरतात, परागकणांची नळी आंत तयार होत असते. वास्तविक नळी उत्पन्न होणे ही पूर्वतयारी आहे. नळीमध्ये खरे पुरुषजननतत्त्व असते. गर्भ कोशांत ( Embryosac ) आल्यावर पुरुषतत्त्व, केंद्राचे दोन विभाग होऊन एक गर्भाण्डाशी संयोग पावते, व दुसरे खालीं असणाऱ्या द्वितीयक केंद्रांशी ( Secondary nucleus ) मिळते. बीजदलें, उगवते कोंब, ह्यांचा गर्भामध्ये अंतरभाव होतो. द्वितीयक अथवा पौष्टिक केंद्रापासून बीजान्न तयार होते. पुष्कळ वेळां ते अन्न् बीजदलां ( Coty-ledon ) मध्ये शोषिलें जाऊन तेथे सांठविले जाते; पण कांहीं ठिकाणीं बीजदलांबाहेर अथवा गर्भाबाहेर अन्नाचा थर राहतो. असल्या बीजांस मगजवेष्टित बीजें म्हणतात, व पहिल्यास मगजविरहित बीजें असे नांव आहे.

 जसे फर्नच्या अस्पष्ट उगवत्या ( Prothallus ) स्थितीत दोन अवयवे उत्पन्न होऊन प्रत्येकांत निराळे जननतत्व आढळते, त्याचप्रमाणे सपुष्पवर्गाच्या परागकणांत व अण्डांंत प्रत्येक निराळी जननतत्त्वे असतात. जसा परागकण अगर बीजाण्ड उत्पत्तीस कारणीभूत असते, त्याचप्रमाणे फर्नचा