पान:वनस्पतिविचार.pdf/233

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


२४ वे ].    पुनरुत्पत्ति.    २०७
-----

कळी सोडणे ( Budding), पेशीविभाग ( Cell-Division), स्वतंत्र पेशी घटना ( Free-cellformation), स्त्री-पुरुषतत्वसंयोग ( conjungation ), अथवा तरुणावस्था (Rejuvenescence ), वगैरे प्रकार उत्पत्तिसंबंधी पूर्वी सांगितलेच आहेत.

 फर्न नांवाच्या वनस्पतीची पाने तपासून पाहिली असतां, पानाच्या खालील पृष्ठभागांवर फोडांसारखे लहान फुगवटे आढळतात. फुगवट्यांचे बाह्यावरण काढिले असतां आंत जननपेशींचे ( Spore ) पुष्कळ समुदाय अथवा संघ सांपडतात. येथील जननपेशी ( Spores ) भुरक्या रंगाच्या असतात. जननपेशी जमिनीवर पडून योग्य परिस्थिति असल्यास उगवू लागते. ही उगवती पूर्वस्थिति (Prothallas ) अस्पष्ट असून जमिनीबाहेर कळण्यासारखी नसते, ह्या स्थितीत पाने वगैरे असत नाहींत. वरील भाग हिरवा असून, खालील भागांवर लहान लहान मुळ्या येतात. मुळयांकडून अन्नद्रव्ये शोषण होऊन वरील हिरव्या शरीरामुळे कार्बनसंस्थापन व सेंद्रिय अन्न तयार करण्याची तजवीज होते. पुढे काही दिवसांनी ह्या फर्नच्या पूर्वशरीरांवर स्त्रीपुरुषव्यंजक अवयवें उत्पन्न होऊन त्यांतील तत्त्वे परस्पर मिलाफ पावतात. संयोग झाल्यावर जमिनीवर फर्नचा रोपा दिसू लागतो. रोग्यास पूर्ववत् पाने येऊन पानांचे मागे वरील फुगवटे येतात, म्हणजे फर्न वनस्पतीच्या आयुष्यक्रमांत स्पष्ट व अस्पष्ट अशी दोन स्थित्यंतरे आढळतात.

 बीजस्थिति फर्न वनस्पतीमध्ये असत नाही; पण तात्त्विकदृष्टया विचार केला असतां फर्नची जमिनीवरील हिरवी स्थिति ही बीजस्थिति म्हणण्यात हरकत नाहीं. संयोगानंतर बीजस्थिति उत्पन्न होत असते, तद्वतच फर्नच्या अस्पष्ट स्थितीवर (Prothallus ) दोन अवयवें उत्पन्न होऊन त्यांतील जननतत्वांचा संयोग झाल्यानंतर फर्न वनस्पतीस ही बाह्य हिरवी स्थिती मिळते. ह्याच स्थितीत संकीर्ण रचना सुरू होते. बीजे म्हणजे छोटी मुग्ध स्थितीतील झाडे होत, बीजांमध्ये बीजदलें, आदिमूळ, प्रथम कोंब असतात, म्हणूनच बीजे व फुले येण्याचे पूर्वीची झाडे ह्यांत फरक कांहीं नसून, फक्त लहान मोठ्या आकारांमुळे त्यांस भिन्नत्व आले आहे. अस्पष्ट स्थितीतील येणारी अवयवें वेगळी असून, त्यांतील जननतत्व आपली मूळ जागा सोडून पाण्याचे साहा-