पान:महाबळेश्वर.djvu/60

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २७ )



पाणी भिक्षुकांनीं उगीच वरून घालून ठेवून धार्मिक लोकांस भाळण्याचें कौसल केलें आहे, अशी कुशंका काढून, त्यांतील पाणी चिरगुटानें वरचेवर पुसून काढण्याचा उपक्रम आरंभिला. बरेचवेळ पाणी पुसून काढलें पण ते खळगे कोरडे तर झाले नाहीतच. परंतु त्यांतून शेवटीं रक्त येऊं लागलें, अशी आख्यायिका आहे. हे कोणास खरें वाटत नसलें, तरी त्यांतील पाणी आटत नाहीं, ही गोष्ट मात्र खरी आहे. याकरितां देवाला पूजा बांधतांना जीं वस्त्र वगैरे घालावीं लागतांत तों भिजून जाऊन खराब होऊं नयेत म्हणून खळग्यावर घालण्यासाठीं तांब्याचीं झांकणें केलेलं आहेत तीं त्यावर घालून ठेवितात. हल्ली देवाजवळ अहोरात्र नंदादीप जळत असतात. त्यांपैकीं एक पेशवाईतील शूर सरदार बापू गोखले यांजकडून चाललेला आहे. त्याचे खर्चीची रकम इंग्रज सरकारचे खजिन्यांतून मिळते. व दुसरा वाठारचे सोनी यांनी ठेविला आहे. यासही सुमारे ५० वर्षे झालीं आहेत, देवळाच्या आंत बाहेरून उजेड पडण्यास कांही