पान:महाबळेश्वर.djvu/224

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(१८९ )


तात. या पाइंटावर गाड्या उभ्या करण्यास जागा चांगली प्रशस्त आहे. येथे बाँड वाजविण्याकरितां उंच चबुतरा केलेला आहे. याला येण्यास दोन वाटा आहेत. एक रस्ता महाड रस्त्यानेंं जाऊन गव्हरमेंट हौसकडे जाण्याचा रस्ता उजवे हातास सोडून गेलेला आहे. दुसरा रस्ता महाड रस्त्यानेंं सुमारे पाऊण मैल गेलेंं, ह्मणजे डावे बाजूला फुटतो. अशा रीतीनेंं ह्या टोकांवर जाऊन उभेंं राहिलेंं ह्मणजे खाली कोयना नदीचेंं खोरे तीन हजार फूट खोल आहे, तेंं पाहून डोळे फिरूं लागतात. समोर इतिहासप्रसिद्ध व आपल्या शिवाजीराजाच्या चरित्रानेंं परिपूत झालेला प्रतापगडचा किल्ला जमिनीवरून नीट सुळ्यासारखा जात आहे, तो नजरेस येतो. किल्लयाच्या उजव्या बाजूस गर्द झाडीमध्ये लहानसेंं टुमदार पारगांव व पुढे पारघाटहीं दिसतात. नंतर पारघाटाच्या माथ्यावरून नवीन बांधलेली महाडची सडक नागिणीप्रमाणेंं नागमोडीनेंं उतरत येऊन कोयनेच्या खोऱ्यामध्ये अल्पकाळ गडप झाल्याप्रमाणे होऊन नंतर मोठ्या डौलानेंं