पान:महाबळेश्वर.djvu/155

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १२० )


सवड करून बाजारांतून आपली पोटगी घेऊन येण्याची त्यांस मोकळीक असे. परंतु हे लोक हा वेळ जवळच्या शेतांत बटाटा किंवा दुसऱ्या इंग्रजी भाज्या करण्यांत घालवीत. ह्या भाज्यांना पाणी देण्याचें कामही फार आयासाचें होतें. ह्या भाज्या तयार झाल्यावर त्यांच्या विक्रीचा पैसा त्यांनीं खिशांत टाकला असतां त्याची कोणी पंचाईत करीत नसत. इकडच्या कामाला कोणी बदली घेऊन कांहीं इमानी कैदी लोकांना बटाटयाच्या राखणीकरितां शेतांत जाऊन निजण्यास सोडीत असत. त्यांनीही इमानाचें बेमान केलें नाहीं. येथील सर्व फिरण्याचे रस्ते ह्याच कैदींकडून करून घेतले आहेत. लष्करी खात्याकरितां जंगलांतील वनस्पतींपासून त्यांच्या कडून अरारोट काढून घेत असत. वर्षास ३५००० पौंड अरारोट त्यांजकडून तयार होत असे. आज येथें होत असलेल्या भाज्या वगैरेच्या बागाइताची चिनी लोकांकडून पुष्कळच सुधारणा झाली आहे, आणि पुष्कळ अंशीं बटाटा वगैरे इंग्रजी भाज्यांची वाढती कळा येण्याचें श्रेयही त्यांनाच आहे. येथील राहणारे अडाणी लोकांस वेताचे करंडे व