पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



     प्रकरण तिसरें.     १०३

क्तीचे नाहीं. शब्दांचा तत्परतेने अभ्यास करणे हें व्यर्थ वेळ घालावण्याप्रमाणें नाहीं हेही वाचकांस कळून आलेच असेल.

---------------
उपसंहार

मागील भाग ज्या वाचकांनी लक्षपूर्वक वाचले असतील त्यांस कळून आलेच असेल की, शब्दांचा अभ्यास हें एक ज्ञानप्राप्तीचे साधन असून शिवाय सूक्ष्म अवलोकनाची संवय होण्यास त्याचा फार उपयोग आहे. आणि आमचे तर असे मत आहे कीं ज्ञानप्राप्तीचे एक साधन ह्या दृष्टीने शब्दांच्या अभ्यासाचे महत्त्व जे आहे त्यापेक्षां सूक्ष्म अवलोकन व सूक्ष्म परीक्षण ह्यांची संवये ही अधिक महत्त्वाची आहे. आणि शब्दांचा अभ्यास हा सूक्ष्म अवलोकनाची संवय मुलांस लावून देऊन मनोरंजक रीतीने त्यांस ज्ञानप्राप्ति करून देतो. ह्याकरितां हे अत्यंत इष्ट आहे की, शब्दांची व्युत्पत्ति, त्यांचे मूळचे अर्थ, अर्थाचा विपर्यास होण्याची कारणे, शब्दांच्या अर्थाचा संकोच, व्याकोच, आणि उत्सार, तदंतर्गत ज्ञान बाहेर काढण्याचे मार्ग, वगैरेकडे आपल्या शिक्षक वर्गाचे लक्ष बिलकूल नसते, ते तिकडे लागावे, आमच्या ह्या लहानशा निबंधांत निर्दिष्ट केलेल्या दिशेने शब्दांचा अभ्यास ज्या कोणी केला नसेल, तो मराठी भाषेमध्ये इतर बाबतींत कितीही तरबेज असला तरी त्यास मराठीचा पंडित हे नांव देणे योग्य होणार नाही. ज्या कोणास ही भाषापरिज्ञानाची शाखा अवगत नाहीं तो मराठी भाषेचा पंडित ह्या बहुमानाच्या पदवीस योग्य नाहीं. ह्या वर सांगितलेल्या दोन उपयोगांशिवाय तिसराही एक मोठा उपयोग शब्दांच्या परीक्षणापासून होण्याजोगा आहे. तो हा की मराठी भाषेविषयीं जो तिरस्कार बहुतेक