पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/104

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे१०२     मराठी शब्दांचे उद्घाटन.

असून त्याचा अर्थ तिळांचा स्नेह, किंवा निष्यंद असा आहे. आगगाडी हा मराठी शब्द आहे. त्याचा अर्थ विस्तवाने चालणारी गाडी असा आहे. तसेच सूतक (सुतक) याचा अर्थ कुटुंबांत मूल जन्मल्यामुळे आलेलें अशौच व शास्त्रोक्त कर्माविषयी अनधिकार असा आहे. तथापि तांबडी शाई, पुस्तकें बांधावयाचा रुमाल, डोईचा रुमाल, भुईमुगाचे तेल, विजेची आगगाडी किंवा बाप मेल्याचे सुतक इत्यादि विरोधगर्भ प्रयोग सदोष होऊ शकत नाहींत. पुणे प्रांतीं कर्नाटकांतल्याप्रमाणे पेवांचे संडास नसून त्यांस शौचकूप असे म्हणतात. करंगळी (करांगुलि) हाताचे बोट असा अर्थ असून पायाची करांगुळी असेही म्हणतात. घड्याळ ( घट्यालय) ह्याचा अर्थ घटी दाखविण्याचे साधन असा असून आपण तो “तास दाखविण्याचे साधन" ह्या अर्थी योजतों; गोमाशी हा गाईच्या अंगावर वस्ती करणारा एक किडा आहे. तथापि आपण " चालत्या घोड्यावरच्या गोमाशा " अशी म्हण वापरतों. फार्स हा इंग्रजी शब्द असून त्याचा अर्थ त्या भाषेत मजेदार किंवा विनोदात्मक किंवा उपहासात्मक लहानसे नाटक असा आहे. परंतु "नारायणरावाच्या वधाचा फार्स !" असे आपण म्हणतों.

 सदरहू प्रयोग जरी शास्त्रदृष्टया व तत्त्वदृष्ट्या अशुद्ध आहेत तथापि त्यांस भाषेतून काढून लावणे शक्य नाही. कारण भाषेमध्ये रूढीच्या द्वाराने त्यांची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे.

 ह्या भागांतील वृत्तगर्भ शब्दांच्या संबंधाने जे विवरण केले आहे त्यावरून वाचकांची खात्री झालीच असेल कीं, शब्दांचे ठायीं प्राचीन गोष्टी, इतिहास, आचार वगैरे अनेक प्रकारची उपयुक्त माहिती आढळते व शब्दांचे परीक्षणाने देशाचा इतिहास स्थूल मानाने उभारतां येतो हे म्हणणे आतिशयो-