पान:मराठी वाड्मयाची अभिवृद्धी.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३०) तरी पण मध्यंतरीच्या तीस चाळीस वर्षांत तीन बाबतींत चांगली सुधा रणा झाल्याचें स्पष्टपणें दिसून येतें. कांहीं नाटकमंडळीनीं गायनवादनाची नवीन टूम काढून केवळ संगति नाटकें करणा-या संगीत मंडळ्या स्थापिल्या. या संगीतमंडळ्या काढण्याचें सर्व श्रेय रा. आण्णासाहेब किर्लोस्कर यांसच दिलें पाहिजे. आण्णासाहेबांच्या प्रयत्नांस यश आलेलें पाहून त्यांचें अनुकरण करणा-या शेंकडों संगीतमंडळ्या उदयास आल्या. रजिस्ट्रार आफ नेटिव्ह पब्लिकेशन्स यांनीं विशेषतः ज्या २५० नाटकांची नोंद करून ठेविली आहे त्यांत सुमारें ५३ नाटकें संगीत आहेत, आणि त्यांपैकीं कांहीं उत्तम नाटकें ऑपेरा नाटकांचे देशी मासले आहेत असेंह्मणण्यास हरकत नाही. संगीत नाँवाखालीं मोडणा-या नाटकांपैकीं पुष्कळशीं नाटकें वाङमयाच्या दृष्टीनें अगदीं कुञ्चकिंमतीची आहेत. तथापि किर्लोस्करांचीं शाकुंतल सौभद्र व रामराज्यवियोग हीं तीन नाटकें नाट्यप्रिय लोकांस अद्यापि अत्यंत प्रिय आहेत जुन्या पद्धतीच्या व कंटाळवाण्या नाटकांच्या शेवटीं हास्यकारक 'फार्स करण्याची आणखी एक नवीन टूम सुरू झाली. या फासांना प्रहसनें असें म्हणतात• अशा प्रकारचीं तीस प्रहसनें यादींत नमूद केलेली आढळतात. प्रहसनें लिहिणे हाच या ग्रंथकारांचा चरितार्थाचा धंदा होता असें दिसतें. तिसरी जी विशिष्ट गोष्ट सांगावयाची आहे ती याच गोष्टीच्या अंगभूत आहे अर्षे म्हणण्यास हरकत नाही. ज्याप्रमाणें पौराणिक नाटकें मार्गे पडून हळू हळू प्रहसनांचें माहात्म्य वाढू लागलें, त्याप्रमाणेंच पुढें प्रहसनांची जागा सामाजिक व राजनीतिविषयक नाटकांनी पटकाविली. यादीमध्यें एकॅ‘दर २५० नाटकांची जी नोंद झाली आहे, त्यांपैकीं जवळजवळ 1°° नाटकांचें संविधानक पुराणेतर विषयांवर रचलेलें आहे. त्यांपैक.वर शेक्सपीयरच्या नाटकांची भाषांतरें असून त्यांपैकीं कांहींचे प्रयोगही रंगभूमीवर अफझलखानाचा मृत्यु व नारायणराव पेशवे यांचा मृत्यु, थां? माधवराव पेशवे यांच्या पत्नीचें सतीगमन वगैरे मराठ्यांच्या इतिहासांतील मनाची खळबळ करून सोडणारे विषय आल आहेत. परंतु एकंदरींत ब-याचशा नाटकांचा रोख सांप्रत स्थितीकडे असून त्यांत बालविवृह, पुनर्विवाह, जरट्विवाह व् ब्रशिक्षण इत्यादि विषयांवर जे सुधारकू दुर्धारकांत झगडे चालले होते त्यांचे चित्र काढिलेलें आहे, व यांपैकी बहुतेकांचा सुधारणा व सुधारक यांवरच कटाक्ष आहे. ببر