पान:मराठी वाड्मयाची अभिवृद्धी.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३१ ) यावरून या विषयांत प्रस्तुत रिपेोर्टाच्या पूर्वीच्या तीस वर्षात अशारीतीनें पुष्कळ प्रगति झाली हें दिसून येईल. नाटकांत उच्च प्रतीच्या गाण्याची भर पडून सामाजिक, राजकीय व नैतिक विषयांचा त्यांत हळुहळु अंतर्भाव होऊं लागल्यामुळे नाट्यकलेची सुधारणा झाली. एकंदरींत या बाबतीत झालेल्या प्रयत्नांवरून भविष्यातू कालांत नाट्यकलेला चांगलें उर्जत स्वरूप प्राप्त होईल अशी आशा वाटू लागली. त्यामुळे लोकांच्या अभिरुचीस सुसंस्कृत व उच प्रतीचें वळण लागून उदात्त विचारांची अभिवृद्धे होण्यास चांगला अवकाश मिळाला यांत बिलकूल संशय नाही. एकंदरींनें विचार करितां ही आभवृद्ध समाधानकारक आहे, परंतु प्रसिद्ध झालेल्या यादीवरून ज्या १५० नाटककारांचीं नावें उपलब्ध होतात त्यांत युनिव्हर्सिटीतील फक्त अकरा पदवीधरांचीच नांवें आढळून यावीं हीच एक कायती निराशा उत्पन्न करणारी गोष्ट होय. रा.कानिटकर, आगरकर, रानडे, महाजनी, कोल्हटकर, राजाध्यक्ष,वागळे, केळकर, पितळे, सामंत आणि काळे, यांच्यासारख्या प्रसिद्ध माणसांची नांवें यांत आली आहेत खरीं, परंतु यांपैकीं शं. मो. रानडे यांखेरीज सर्वांचा भर विशेषतः भाषांतराकडेच आहे. रा. परशुरामपंत गोडबोले;वि.ज. कीर्तने,देवल, खरे, कानिटकर,केळकर आणि रानडे यांचीं भाषांतरें लोकादरास फारच पात्र झाली आहेत. स्वतंत्र नाट्यरचनेंत इंदूरचे दिवाण व बडोद्याचे नायब दिवाण मोठे कीर्तने यांचाच नंबर पहिला लागतो व तें यथायोग्य ही आहे. रानडे, देवल, किर्लोस्कर आणि कानिटकर ह्यांचीं नाटकेंही उत्तमांमध्येंच गणिली जातात. इंग्रजी नाट्यकलेच्या दृष्टीनें पाहूं गेलों असतां आपल्याकडील प्रधान नाटकें हीं गौणच ठरतील, हें सहाजिक आहे. परंतु जी नाट्यकला इंग्लंडांत आज शेंकडों वर्षे वृद्धिंगत होत आहे तिच्याशीं नुकत्याच जन्म पावलेल्या इकडील नाट्यकलेची तुलन, करणें वाजवी होणार नाही. परंतु, स्वतंत्र नाट्यरचना व युनिव्हर्सिटीशिक्षण यांच्यामध्यें जी फारखत झाली आहे तिच्या योगानें ज्यांना ज्यांना आमच्या राष्ट्रीय वाङ्मयाच्या अभिवृद्धीची कळकळ वाटत आहे त्यांना त्यांना अत्यंत काळजी वाटल्यावांचून राहणार नाहीं ही गोष्ट त्याबरोबरच उघड आहे. कादंब-याः-नाटकांविषयीं जे विचार वरतीं प्रदर्शित केले आहेत तेच बहुतांशीं कादंब-यांसही लागू पडतात; मात्र नाटकांप्रमाणें कादंब-या आमच्या पुरातन वाङ्मयास माहीत नव्हत्या असें नाही. इंग्रजीतल्या 'फेअरॉटेल्स ; चा मासला आमच्या वेताळपंचविशी, विक्रमबतिशी, शुकबहातरी वगैरे गोष्टीं -