पान:मराठी रंगभुमी.djvu/90

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
७४
मराठी रंगभूमि.


इसमांच्या हातून चांगले वठलेलेही आहे. पण नाटकाचा रंग त्यांतील पात्रांच्या परस्पर अभिनयावर विशेष अव- लंबून असतो या गोष्टीकडे त्यांचे लक्ष जात नसल्यामुळे सुमेरसिंगा चे भूमिका घेणाऱ्या एका इसमाने आपल्या- कडून कितीही मेहनत घेतली व कितीही दक्षता ठेवली तरी एकंदर नाटकास रंग भरणार नाही हे ध्यानांत धरले पाहिजे. रंग भरण्यास इतर पात्रांची कामें चांगली झालीच पाहिजेत. सुमेरसिंगाचा क्रूरपणा विशेष व्यक्त होण्यास नारायणरावाची पोरबुद्धि व पोरस्वभाव ही चांगली दिसून आली पाहिजेत. तसेंच नारायणरावाचा चेहराही राजपिंड दिसला पाहिजे, झणजे त्यानेही सुमे- रसिंगाच्या क्रूरपणास जास्त तीव्रता येणार आहे. पुष्कळ नाटककंपन्यांत नारायणरावाचे पात्र असावें तसें असत नाहीं, झणजे त्याचा आंगलोट, चेहरा ही पेशव्याच्या कामास शोभण्यासारखी नसतात. एवढच नव्हे तर संपत्ति, वैभव, इतमाम वगैरे ज्या गोष्टींची पेशव्यास अनुकूलता होती त्या गोष्टीही पोषाख, अलं- कार, नोकरचाकर वगैरे साहित्याने ते दाखवीत नाहीत. नारायणरावाच्या वधाने सुमेरसिंगाच्या कोर्याबद्दल व आनंदीबाईच्या नीच कृतीबद्दल प्रेक्षकांच्या मनावर जसा ठसा उमटावयास पाहिजे तसाच नारायणरावासारख्या अप्रबुद्ध राजपिंड पेशव्याच्या वधाबद्दलही हळहळ लागली पाहिजे. पण या गोष्टी एकमेकांवर अवलंबून