पान:मराठी रंगभुमी.djvu/89

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७३
भाग १ ला.


पुस्तकांतून सन १८७७-८१ पर्यंत ' श्रीमन्नारायणराव पेशवे ' हें नाटक प्रसिद्ध केलें असून त्याचा प्रयोगही १८८१ च्या मे महिन्यांत त्यांनीं नागपुर येथील सिटी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून आपल्या देखरेखीखालीं करविला होता. पण हीं नाटकें साधावीं तितकीं चांगलीं न साधल्यामुळे प्रयोगास विशेष बहार चढला नाहीं. असो; हल्ली नाटककार नारायणरावाच्या वधाचें जें नाटक करितात त्यांत विसंगतपणा पुष्कळ असून ऐतिहासिक नाटकांचा लोकांच्या मनावर जो परिणाम व्हावयास पाहिजे तो त्यापासून मुळींच होत नाहीं. आनंदीबाई ही जर कृत्या होती तर तिची दुष्ट कृती व नीच कारस्थानें हीं चांगल्याच रीतीनें लोकांच्या नजरेपुढें आलीं पाहिजेत. नुसता ' ध ' चा ' मा ' केल्यानें किंवा सुमेरासिंगास वरचेवर ' तूं रजपूत आहेस कीं धेड आहेस?' असे टोमणे मारल्यानें तीं दिसुन येत नाहींत. गावाबदादाची बुद्धि पूर्वी कशी होती, मागाहून ती कशी पालटली, ती पालटण्यास आनंदीबाईचीं नीच कारस्थानें किती कारणीभूत झालीं व खुद्द राघोबादादा कितपत बाईलबुद्धीचें होते, वध करावंण्याचे कामीं त्यांचें आंग होतें वगैरे गोष्टी या नाटकांत विशेष रीतीनें व्यक्त व्हावयास पाहिजेत. या नाटकाचा प्रयोग करतांना नाटकवाले मुख्य लक्ष ठेवतात तें सुमेरसिंगाच्या कामाकडे व हें काम रा० दाते, लोखंडे, प्रधान वगेरे दोन तीन