पान:मराठी रंगभुमी.djvu/91

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७५
भाग १ ला.


आहेत, व ह्मणून सर्व पात्रांचीं कामें प्रसंगास अनुसरून व अगर्दी बारीकसारीक गोष्ठीत सुद्धां यथायोग्यच झालीं पाहिजेत. एकाचा कमीपणा तो दुस-याचा कमीपणा व एकाचा रसभंग तो दुसयाचा रसभंग हें नाटककारांनीं नेहमीं लक्षांत ठेविलें पाहिजे. कारस्थान करण्याच्या हेतूनें आनंदीबाई गजाऊ दासीकडून सुमेरासिंगास एकदम बोलावून आणते, आणि गजाऊ दासी गादीं लोकांची कवाईत चालली असतां भर लष्करांत जाऊन कजागपणें त्यास बोलावून आणते, या गोष्टी सर्व विसंगत आहेत. पण त्याचें आमच्या 'ना टकवाल्यांस कांहींच वाटत नाहीं. खुनासारखी भयंकर गोष्ट करण्याची कल्पनाच आधीं किती भयंकर आहे; त्यांतून यःकश्रित मनुष्याचा खून नसून नारायणरावासारख्या पेशव्याचा खून; त्याची वाटाघाट किती गुप्तपणे झाली पाहिजे; खुनाची गोष्ट सुमरसिंगाच्या कानावर घालण्याइतकी तयार होण्यापूर्वी तिचुा सर्व बाजूंनीं किती सिद्धता झाली पाहिजे; दरबारचें कारस्थान किती सांभाळलें पाहिजे; दादासाहेबांच्या मनात किती पातक उत्पन्न केलें पाहिजे: खून होते वेळी नारायण रावांच्या पदरच्या माणसांची वागणूक कशी होती; दादासाहेबांचे कसे होतें; दरबारांतील मुत्सद्दी मंडळी कात करीत होती वैगरे गोष्टी फारच सुरेख रीतीनें व्यक्त झाल्या पाहिजेत. त्या तशा होत