पान:मराठी रंगभुमी.djvu/87

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
७१
भाग १ ला.


कांत विशेष भर पडण्यास राष्ट्रीयसभा, शिवाजीमहोत्सव वैगैरे गोष्टीही पुष्कळ अंशीं कारणीभूत झाल्या आहेत.
 पहिल्या पहिल्यानें कोणतीं ऐतिहासिक नाटकें होत होतीं, तीं कशी होत होतीं, हल्लीं कशीं होतात, त्यांत सुधारणा काय झाल्या पाहिजेत, वगेरे मुद्यांसंबंधानें थोडें लिहितों. अगदीं आरंभीचीं ऐतिहासिक नाटकें होटलों ह्मणजे 'नारायणराव पेशव्यांचा वध' व 'झांशीची राणी लक्ष्मीबाई इचें बंड'* हीं होत; व तीं आळतेकर नाटक मंडळी करीत असे. पुढें हीं नाटकें सांगलीकर, पुणेंकर वगैरे मंडळी करूं लागली. हींच दोन ऐतिहासिक नाटकें आरंभीं कां होऊँ लागलीं याचा थोडा विचार केला म्हणजे असें दिसून येतें कीं, नारायणराव


 * झांशीच्या राणांच्या बंडाचें नाटक अलीकडे मुळींच होत नाही. याचें कारण १८५७ सालच्या धामधुमीचा यांत इतिहास असून त्याचा आमच्या सरकारांशी संबंध पोंचत असल्यामुळे सरकारची मर्जी खप्पा होईल या भीतीनें ह्मणा, आमचें मानसिक दौर्बल्य वाढत चालल्यामुळे ह्मणा, अगर स्वाभिमानाची ओळख आह्मी विसरत चाललों ह्मणून ह्मणा, कोणत्या त्री गोष्टीनें या बंडास नाट्ककारांनीं रजा दिली आहे. एवढेंच नव्हे तर, काहीं काहीं इतिहासकारांनीही झाशीची राणी बंडखोर नव्हती, गैरसमजानें इंग्रजांशीं ती लढत होती, असेंही प्रतिपादन केलें आहे. असो; 'नारायणराव पेशव्यांचा वध 'ही याच पंथास लागला आहे. त्याला आतां वध न ह्मणतां 'मृत्यूचें नाटक ' असें सौम्य नांव नाटककारांनीं दिलें असून तें कचित्र प्रसंगींच रंगभूम्यावर पहावयास मिळतें.
 केसरी वर्ष १ अंक •८ पहा.