पान:मराठी रंगभुमी.djvu/88

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७२
मराठी रंगभूमि.

पेशव्यांचा वध ही पेशवाईंतील अखेर अखेरच्या गोष्टीं- पैकी एक मोठी व महत्वाची गोष्ट असून महाराष्ट्रांतील लोकांत ती ताजी असल्यासारखी होती. झांशीच्या राणीचे बंड तर नाटके सुरू असतांच झाले. अर्थात् या दोन गोष्टी ताज्या असल्यामुळे नाटकरूपाने लोकांपुढे मांडल्यास लोकांना त्या आवडून त्यांपासून उत्पन्न चांगले होईल असें त्या वेळच्या नाटकमंडळीच्या चालकांस वाटले असावें. आतां वरील दोन गोष्टी नाटकाच्याद्वारे लोकांपुढे मांडून पैसे मिळविण्याची संधी कांहीं नाटकवाल्यांनी साधली खरी, पण त्याबरोबरच व्यवस्थित रीतीनें व ऐतिहासिक माहितीस धरून वरील दोन गोष्टी नाटकरूपाने लोकांपुढे आल्या असत्या तर फार बरे झाले असते. अशा प्रकार त्या आल्या नाहीत ह्मणूनच त्यास 'फार्स ' असें थट्टेचें नांव पडले.* अजूनही या दोन गोष्टींवर व्हावी तशी नाटके झाली नाहीत. कोल्हापुरच्या रा. रायसिं- हराव ओव्हरसीयर नांवाच्या एका गृहस्थांनी नारायण- रावाच्या वधावर एक मोठे नाटक रचलें आहे व त्याचे कोल्हापुरास काही प्रयोगही करविले. तसेंच रा. हरी माधव पांडित यांनीही 'विविधज्ञानविस्तार, मासिक


 * रा० गणपतराव भिडे यांनी जे नाटक लिहिले आहे, त्यास तर 'नारायणरावाच्या मृत्यूचा फार्स ' असें नांव दिले आहे व तसेंच रा० कार्लेकर यांनीही 'अफझुलखानाच्या मत्यचा फार्स' ह्मणून एक पुस्तक रचले आहे. टिपू सुलतान, दामाजीपंत वगैरे पुरुषांसंबंधाने जी नाटके झाली आहेत तीही फातिच मोडतात.