पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७९

 "एवढा मोठा व्यूह रचून ज्या समारंभाच्या आरंभाच्या दिवशींच तो उभा करणारास त्याचा हातधरणाराच सोडून देऊं लागतो तेव्हां ऐन समयाला आतां समया लावून प्रकाश पाडणारा कोण येतो तें पहावें."  हा अलंकार गद्यांत क्वचितच येतो.

२ अनेकार्थी शब्दांच्या अर्थचमत्काराचा वर्ग.

 ह्या विशाल शब्दराशींत पुष्कळ शब्द एकाहून अधिक अर्थांचेही वाचक आहेत. त्यांची जेव्हां वाक्यांत योजना होते तेव्हां त्यांच्या अनेक अर्थांपैकी कोणत्यातरी एकच अर्थाचा उपयोग होतो व बाकीच्या अर्थांच्या बोधाची त्यांत शक्ती असतांही तिचा कांहीं उपयोग होत नाहीं तो. जसें --

 श्रीमच्छंकराचार्यचरित्रग्रंथांत, सुधन्वाराजा, ज्यानें वैदिकधर्माचा त्याग करून बौद्धधर्माचा स्वीकार केला होता, त्याच्या सभेंत शंकराचार्य गेल्याचें वर्णन आहे; त्या ठिकाणीं एका वृक्षावर कोकिळ बसलेला आहे व तो मधुरस्वर करीत आहे, हें आचार्यांनीं पाहून त्यास उद्देशून पुढें लिहिलेलें वाक्य उच्चारिलें.

 "हे कोकिळ! मलिन, नीच व श्रुतीला दूषित करणारे अशांची जर तुला संगति नसती, तर तुझ्यासारखा योग्य प्राणी जगतांतही मिळणें कठिण झालें असतें."

 ह्या वाक्यांत मलिन, नीच, आणि श्रुतीला दूषित करणारे ही विशेषणे व्यर्थ आहेत. एका अर्थानें तीं