पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७८

 “अरे मूढा, अम्मळ पुढें ये. आतां आढेवेढे कां घेतोस? आजवर तुला मीं वाढवून मोठा केला तो मला बाजारांत ओढण्याकरितां काय रे? बरें तर, तुला भांडाभांडीच करणें आहे तर मीही दंड फटकारून तुझ्या प्रचंड बंडाचे खंड खंड करण्यास सिद्ध आहें."

 ह्यांत क्रोध ह्या मनोवृत्तीस प्रधानता असल्याने, येथें ढकाराच्या आवृत्तीपासून वाक्यास कठोरता येऊन क्रोधाच्या उत्कर्षास थोडी मदत झाली आहे.

 तसेंच--

 "आपले उपकार वारंवार फारफार आह्मी स्मरत आहोंत. आपण तनमनधनेंकरून आमच्या लालनपालनांत सतत मेहनत घेत आहांत हें आह्मांस दिसत नाहीं काय? आह्मी तर नित्य जीवाभावापासून देवाधिदेवाजवळ आपला मनोरथ पूर्ण व्हावा हेंच मागतों."

 ह्या वाक्यांत प्रेमरस प्रधान असून त्यांत रकार, तकार, आणि वकार ह्या अत्यंत मृदुवर्णांची आवृत्ति असल्यानें वाक्यास मार्दव येऊन प्रेमाच उत्कर्ष व्यंजित झाला आहे.

यमक.

 कांहीं वर्णांचा समुदाय एकदांज्या क्रमानें आला असतो, त्याच क्रमानें त्याची पुनरावृत्ति झाली असतां, यमक हा अलंकार होतो. अनुप्रासांत व्यंजनें भिन्नखर असलीं तरी चालतें तसें ह्यांत चालत नाही. ह्यांत पूर्वी क्वचित् वर्णाची त्याच क्रमानें आवृत्ति आली पाहिजे. जसें--