पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८०

काकादिक पक्ष्यांस लागतात व दुसच्या अर्थानें तीं बौद्धादि वेदनिंदकांस लागतात.

 ह्या वर्गांत श्लेष, वक्रोक्ति हे अलंकार मुख्य आहेत.

श्लेष.

 जेथें दोन दोन अर्थांच्या शब्दांची योजना केली असते, तेथे हा अलंकार होतो. जसें--

 "आमच्या पत्रांवर कोणी किती जरी टीका केल्या तरी जे जाणणारे आहेत ते जाणतच आहेत कीं दुसऱ्याच्या देवाधर्माचीं मिथ्या छिद्रें शोधण्यास्तव आमचा ज्ञानोदय नाही, किंवा सब गोलंकार करविणारी ही सुबोधपत्रिका नाहीं. तर आहे तशी खरी वार्ता परग्रामीं नेऊन पोंहोंचविणारा हा केवळ वार्ताहर आहे.”

 ह्यांत ज्ञानोदय, सुबोधपत्रिका आणि वातहर हे तिन्ही शब्द दोन दोन अर्थानें योजिले आहेत. ह्यणून येथे श्लेषालंकार होतो.

वक्रोक्ति.

 एखादा शब्द किंवा वाक्य ज्या अभिप्रायानें उच्चारिलें असेल, त्या अभिप्रायाहून भिन्न असा त्याच शब्दाचा किंवा वाक्याचा दुसरा अर्थ घेऊन कोणी उत्तर दिलें असतां, तेथें हा अलंकार होतो. हा दोन प्रकारांनीं होतो. एक श्लेषाच्या साह्यानें व दुसरा काकूंनें. जसें--


१ मान हालवून किंवा आवाज बदलून प्रश्न केल्यासारखें जें भाषण तें.