पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७३

होणें, नाकास पदर लावणें हे अनुभाव. आणि व्याधि, अपस्मार, मोह, उद्वेग, आवेग हे व्यभिचारीभाव.

 द्यांतही स्वनिष्ठ आणि परनिष्ठ असे दोन भेद आहेत.

 ह्या घाणेरड्या रसाचे उदाहरण देण्यापेक्षां वाचकांनीं वरच्या क्रमाप्रमाणें अन्यत्र कोठें तें पाहून घ्यावें.

अद्भुतरस.

 विस्मयाची पूर्णावस्था तो अद्भुतरस होय. ह्यांत विस्मय हा स्थायीभाव होय.

 चमत्कारिक भाषण, सुंदर शिल्पकामें, मनोहर वस्तु, जादूगाराचे हस्तकौशल्य, अमानुष कृत्ये, इत्यादि विभाव. हा उत्पन्न झाला असतां मनुष्य एकदम आश्चर्यानें चकित होतो, टक लावून पाहूं लागतो, स्तुति करितो, इत्यादि अनुभाव. आणि ह्या गोष्टी झाल्या असतां, जडता, आवेग, संभ्रम, हर्ष, वितर्क, मोह, मति इत्यादि व्यभिचारीभाव.

 उदाहरण—"त्या चित्रकारानें करून आणिलेला मेणाचा द्राक्षांचा घड राजानें एका लतामंडपावर ठेविला, तों त्यावर पाखरे येऊन बसू लागलीं. हें पाहून राजास फारच आश्चर्य वाटलें. त्यानें चित्रकाराची फार प्रशंसा केली व त्यास मोठे इनाम दिलें." किंवा जसें--

 “अहो! काय सांगावें! मी घट्ट आवळून धरलेला पिंजरा एकदम माझ्या हातांतून मला नकळत निसटून गेला तरी कसा! जादू झाली तरी पण काय हा चमत्कार!

  भा. ७