पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७४

अहाहा! ईश्वरानें कोठें काय गुण ठेविले आहेत ते त्याचे तोच जाणे. एकून, बाबू कमलाकांताच्या कौशल्याची धन्य खरी! पण कांहो, हा कां मंत्रप्रभाव म्हणावा, कीं विद्युत्प्रभाव कायसें म्हणतात तो म्हणावा, कीं इंद्रजाल विद्या म्हणावी? काय, आहे तरी काय! तो कांहीं मांत्रिक तर दिसत नाहीं. मला वाटतें, ही सर्व नजरबंदी दिसते! छे, छे, मला पक्कें पक्कें आठवतें कीं, मी तो पिंजरा घट्ट धरून ठेविला आणि रुमाल वर करून पाहतों तों पिंजरा नाहीं. काय हें! ही नजरबंदी कशी!"

 ह्यांत विस्मयाचे आलंबन बाबू कमलाकांत. व पिंजरा उडवून नेणें हें उद्दीपक. आणि स्मृति, हर्ष, तर्क, मति इत्यादि संचारी सहायक असून आश्चर्यद्योतक अंगव्यापार, अनुभाव आहेत.

शांतरस.

 वैराग्याची पूर्णावस्था तो शांतरस होय. ह्यांत निर्वेद (विषयसुखाविषयीं जी तिरस्कारबुद्धि) हा स्थायीभाव होय.

 सत्पुरुषसमागम, सारासार विवेक, पुण्यस्थलदर्शन, त्रिविधतप्ताचा ताप, भगवत्कथाश्रवण, भक्तचरित्रें, विषयपराङ्मुखता, देहाची क्षणभंगुरता, इष्टवस्तूची अनित्यता इत्यादि विभाव. तो उत्पन्न झाला म्हणजे प्रेमाश्रु वाहूं लागतात, मन आनंदित होतें, कंठ सग्ददित होतो, रोमांच उठतात, परमेश्वरप्राप्तीची जास्त हुरहुर लागते, भूतदया इत्यादि अनुभाव. आणि अशा प्रसंगीं मति, स्मृति, चिंता,