पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७२

ज्वाळा होत होत्या. राक्षसास मोठमोठे दोन दांत होते. व हिंगुळासारखी लाल जीभ तो वारंवार बाहेर काढून मोठ्यानें ओरडत होता. असें तें सोंग पहातांच राजकुमारास फार भय वाटलें. जरी क्षणैक तें त्यानें दाबून ठेविलें, तरी त्याच्यानें तें दाबलें गेलें नाहीं. त्याचें अंग थर थर कांपूं लागलें, त्याची छाती धडधड करूं लागली. तो घाबऱ्या घाबऱ्या इकडे तिकडे पाहूं लागला. व शेवटीं एकदम उठून आंत गेला. आणि वृद्ध हुजऱ्याच्या गळ्यांत मिठी मारून मोठ्यानें रडूं लागला."

 ह्यांत राक्षस, हा आलंबनविभाव आहे. त्यास पाहून राजकुमाराच्या मनांत भय हा स्थायीभाव उत्पन्न झाला. तो राक्षसाच्या भयंकर स्वरूपानें व चेष्टेनें उद्दीपित केला. आणि कंपादि अनुभावांनीं पूर्ण केला. ह्यांत संचारीभाव स्पष्ट वर्णिले नाहींत.

 ह्यांतही स्वनिष्ठ आणि परनिष्ठ असे दोन भेद आहेत. स्वापराधापासून उत्पन्न झालेलें जें भय, तें स्वनिष्ठ आणि इतररीतीनें उत्पन्न झालेलें जें भय, तं परनिष्ठ होय.

बीभत्सरस.

 चिळस या मनोवृत्तीची पूर्णावस्था तो बीभत्स रस होय.

 ह्यांत जुगुप्सा हा स्थायीभाव होय.

 कंटाळा किंवा किळस येणारे पदार्थाचें पाहणें, त्याचा स्पर्श, किंवा गंध हे त्याचे विभाव; नाक मुरडणें, वांति