पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५२

पूर्ण करितो, इत्यादि कृष्णस्वभावाचें जें स्मरण, हें त्या विकाराचें साह्यकारी होय. याच रीतीनें इतर मनोविकारविषयीं जाणावें.

 मनोवृति उत्पन्न होण्याचें जें कारण असतें, त्यास विभाव; तिचें जें कार्य असतें, त्यास अनुभाव; आणि तिच्या अनुषंगानें इतर मनोवृत्ति उत्पन्न होतात, त्यास संचारी किंवा व्यभिचारीभाव ह्मणतात; आणि मुख्य मनोवृत्तीस स्थायीभाव ह्मणतात. तेव्हां पारिभाषिक रीतीनें रसाची लक्षणा-"विभाव, अनुभाव व व्यभिचारीभाव ह्यांच्या योगानें पक्व अवस्थेला पावलेला जो स्थायीभाव, तो रस होय;" अशी होते.

 अमुक स्त्री हावभावांत फार निपुण आहे अशी रूढींत ह्मण आहे. त्या दोहोंचीं लक्षणें.

 हाव*-स्त्रीयांच्या शृंगारिक ज्या चेष्टा, ते. हे दहा प्रकारचे आहेत. त्यांचीं नांवें.


 १ विभावानुभावसात्विकव्यभिचारिभावैरुपचीयमानः स्थायीभावः परिपूर्णी रस्यमानो रस:; भावविभावानुभावव्यभिचारिभावैः मनोविश्रामो यत्र क्रियते स वा रसः; प्रबुद्धस्थायीभाववासना रसः ।

 * नारीणां शृंगारचेष्टा हावाः. १ प्रियभूषणवचनाद्यनुकृतिलीला. 2 गमनवदननयनभ्रूप्रभृतीनां यः कश्चिदुत्पद्यत्वे विशेषः स विलासः ३ कतिपयभूषणविन्यासो विच्छितिः ४ वागंगभूषणानां स्थानादिविपर्यासो विभ्रम: ५ श्रमाभिलाषगर्वस्मितहर्षभयक्रुधां असकृत्संकर: प्राज्ञैर्विज्ञेयं किलकिंचितं. ६ वार्तावैमुख्येसति निभृतभूयोदर्शने स्पृहा मोदायितं. ७ दुःखे सुखचेष्टा कुट्टमितं. ८ गर्वाभिमानसंभूती