पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५३

 लीला-प्रिय भूषणवचनादिकांची जी अनुकृति, तो.

 विलास-गमन, वदन, नयन, भ्रू प्रभृतीपासून कांहीं एक उत्पन्न होतें, तो.

 विच्छिति-कितीएक आभरणांचा जो विन्यास, तो.

 विभ्रम-अंगभूषणाचे स्थानाचा जो विपर्यास, तो.

 किलकिंचित-श्रम, अभिलाष, गर्व, स्मित, हर्ष, भय, क्रोध, यांचा जो संस्कार, तो.

 मोदायित-अबोला असतां, वारंवार दर्शनाची इच्छा होऊन, कांहीं कामाच्या मिषानें समोर येणें, तो.

 कुट्टमित-सुखदुःखाच्या ज्या चेष्टा, तो.

 विब्वोक-गर्वापासून झालेले विकारानें जो अनादर, तो.

 ललित-सर्वांगांचें सामान्य रीतीनें यथायोग्य स्थापन, तो.

 १० विहृत—प्रियसन्निध अभिलाषेची जी परिस्फूर्ती, तो.

 हे दहा भाव स्त्रियांचे ठिकाणीं स्वभावसिद्ध असतात. पुरुषांचे ठिकाणीं सोपाधीक कधीं कधीं येतात. या दहांपैकीं अनुक्रमें १, २, ३, ४ व ९ असे पांच शारीर आहेत; ६, ७ आणि ८ हे तीन अंतर आहेत; आणि ५ व १० हे उभय संकीर्ण आहेत.


विकारोऽनादरात्मको विव्वोकः ९ सकलांगसमीचीनविन्यासो ललितं. १० प्रियसन्निधावभिलाषपरिस्फूर्तिं विहृतं.