पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५१

वर्णन केलें असतां, वाचकाच्या मनांत, तें वाचून कांहीं विशेषं प्रकारचा आनंद उत्पन्न होतो, त्या आनंदासच रस असें ह्मणतात.

 मनाला आनंद होण्याचीं कारणें दोन: एक तर सृष्टपदार्थवर्णन, व दुसरें त्यांच्या केवळ अवलोकनामुळे किंवा लाभाऽलाभामुळें शोकसुखाचा मनावर जो आघात होतो तो. तथापि खरें पाहिलें तर आनंद, शोक, मोह, भ्रम, इत्यादि विकार, हे सर्व मनाचे आहेत. तेव्हां लेखकाचें, लेखांत खरें कर्तृत्व ह्मटलें ह्मणजे, योग्य ठिकाणीं योग्य मनोविकार योग्य रीतीनें जागृत करणें हें होय. तेव्हां रस हा वर सांगितल्याप्रमाणें मनोविकार जागृत झाल्याचा परिणाम आहे. व ह्मणूनच मनोविकार उत्पन्न होण्याला जीं कारणें, कार्य व साह्य लागतें, तेंच रसीत्पतीला लागतें. उदाहरणार्थ-—

 "श्रीकृष्णानें सुदाम्याला सोन्याची नगरी दिली. ती नगरी पाहून सुदाम्याला आनंद झाला व त्यामुळे तो एकदम नाचू बागडूं लागला; व भ्रमांतही पण पडला.”

 येथें आनंद हा प्रधान मनोविकार, हा उत्पन्न होण्यास सुवर्णनगराचें पाहणें, श्रीकृष्ण व त्याचें अद्भुत देणें, हीं कारणें. नाचणें, बागडणें, आनंदानें मोहून जाणें, इत्यादि हीं त्या विकाराचीं कार्यें; व देव स्वभक्ताची सर्व इच्छा


 १ विशेष प्रकारचा ह्मणजे, कांहीं अभीष्टार्थ सिद्ध झाल्यामुळे होणाऱ्या लौकिकी आनंदापेक्षां जो निराळा तो.