पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४०

 एके ठिकाणीं मालाकार ह्मणतात, "आजवर कालिदासाच्या सरस्वतीचें जें आह्मीं असोशीनें प्राशन केलें.”

 या वाक्यांत सरस्वती शब्द प्रवाहाचा लक्षक आहे.

 याच अर्थावरून अलंकारिकांनीं मुद्रा नांवाचा अलंकार साधला आहे. प्रकृतार्थाचीं सूचक अशीं पदें जेथें असतात, तेथें हा अलंकार होतो; किंवा नाटकांत पुढें होणाऱ्या अर्थाची सूचना असते, तेथेंही मुद्रा हाच अलंकार मानितात. जसें - अनर्घराघव नाटकाचे आरंभीं सूत्रधार ह्यणतो--

 "जनहो, न्यायानें वागणारास पशुपक्षी सुद्धां सहकारी होतात, पण अन्यायानें वागणारास त्याचे सखे बंधू देखील अहितकारी होतात. हें या खेळांवरून आपणांस स्पष्ट दिसून येईल."

 यांत प्रकृत पदार्थानें रामरावणाख्यान सुचविलें आहे.

 लक्ष्यार्थ करितांना, कधीं वाच्यार्थ घेऊन त्याशिवाय आणखी ज्यास्त अर्थ घ्यावा लागतो. जसें--

 "सांप्रतचा काळ पूर्वीप्रमाणें तीरकमटें, तरवारी किंवा बंदुकींनीं द्रव्यार्जन करण्याचा नाहीं, तर लेखण्या, कुदळी, पावडें व यांत्रिक चक्रांचा आहे."

 ह्या वाक्यांत तीरकमटें, तरवारी, बंदुकी, लेखण्या, कुदळी, पावडे व चक्रें ह्या शब्दांचा वाच्यार्थ घेऊन शिवाय ते ते पदार्थ धारण करणारे पुरुषही लक्ष्यार्थानें घ्यावे लागतात; असें लक्ष्यार्थयुक्त वाक्य लिहिण्यांत वक्त्याचा हेतु "सांप्रतकाळीं शैौर्यगुणानें पैसा मिळणारा