पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३४

रच आहोंत. येथें इतकेंच सांगावयाचें कीं, रूढीवरून होणाऱ्या लक्ष्यार्थापेक्षां, हा थोड्या निराळ्या प्रकारचा असतो; ह्मणजे रूढलक्ष्यार्थ जसा लाक्षणिक शब्दांपासून बोधित होतीच, तसा प्रकार नैमित्तिक लक्ष्यार्थाचा नाहीं. वक्त्यास व्यंग्यार्थ सूचित करण्याची अपेक्षा असली, तरच तो प्रतीत होती, एरवीं होत नाहीं. ही गोष्ट चांगली ध्यानांत ठेविली पाहिजे. या नैमित्तिक लक्ष्यार्थाचेही १ गौण, २ शुद्ध, ३ विरुद्ध, आणि ४ लक्षित, असे चार भेद आहेत. त्यांचीं लक्षणें व उदाहरणें.

 १. गौण-याचें लक्षण पूर्वी सांगितलेंच आहे कीं, गुणसादृश्यावरून होणारा जो लक्ष्यार्थ, तो गौणलक्ष्यार्थ होय. जसें--

 (१) बाळ्या हा काय शुद्ध बैल आहे.

 (२) हा राजा काय साक्षात् कर्ण आहे.

 (३) एक ग्रंथकार, नाना फडणविसाविषयीं ह्मणतात; पेशवाईत ज्याचा प्रकाश भूमंडलावर पडत होता असें रत्न एकच होतें.

 या वाक्यांतील पहिल्यांत, बैलांतील जडत्वगुणाच्या साद्यश्यानें वक्तयानें बाळ्यावर बैलाचा आरोप केला आहे. यांत बाळ्याचा निंदारूप व्यंग्यार्थ सूचित करणें हें निमित्त आहे. दुसऱ्यांत, राजाच्या औदार्यसूचनेनुरूप व्यंग्यार्थाच्या निमित्तानें कर्णाचा राजावर आरोप केला आहे. तिसऱ्यांत, नानाच्या बुद्धीची प्रशंसा करण्याच्या