पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३५

निमित्तानें तेजस्विता ह्या रत्नाच्या धर्मसादृश्यावरून नानावर रत्नाचा आरोप केला आहे.

 ह्या नैमितिक गौणलक्ष्यार्थात गुणसादृश्यावरून एकावर दुसऱ्या पदार्थाचा आरोप करून त्या दोन्हीं पदार्थात अभेद दाखविला असतो. हा आरोप दोन प्रकारांनीं होती. त्यांची लक्षणें व उदाहरणें.

 १. ज्या पदार्थावर ज्या दुसऱ्या पदार्थीचा आरोप केला असतो, त्या दोन्हीं पदार्थीचा वाक्यांत कधीं स्पष्ट उल्लेख केला असतो तो गौण सारोप. जसें मागील उदाहरणांत--

 (१) बाळ्या हा काय शुद्ध बैल आहे.

 (२) हा राजा काय साक्षात् कर्ण आहे.

 ह्या उदाहरणांत 'बाळ्या व बैल' आणि 'राजा व कर्ण' ह्या दोन्ही पदार्थाचा उल्लेख केला आहे.

 २. कधीं त्यांपैकीं ज्याचा आरोप केला असतो त्या एकाच पदार्थाचा मात्र उल्लेख केला असतो तो गौण साध्यवसान. जसें मागील उदाहरणांत--

 (३) एक ग्रंथकार नानाफडणविसासंबंधानें ह्मणतात 'पेशवाईंत ज्याचा प्रकाश भूमंडलावर पडत होता असें रत्न एकच होतें.'

 ह्यांत नानावर रत्नाचा आरोप केला आहे, परंतु वक्त्यानें नानाचा उल्लेख न करितां रत्नाचाच केला आहे.