पान:भाषाशास्त्र.djvu/305

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९६ , भाषाशास्त्र. फारच सुधारलेली अाण पुष्कळ सरसावलेली असल्याच्या योगाने, आम्हांला त्यावेळी लिपिज्ञान असणे अगदी साहजीक होते. आणि दसरे असे की, प्रातिशाख्यासारख्या शास्त्रीय विषयाचे विवेचन लिरिज्ञानाशिवाय शक्यच नाहीं; व म्हणूनच त्यांत लेखनकलेचा अन्तर्भाव होतो, असे म्हणणे प्राप्त येते. परंतु, इतक्यानेच वाचकाचे समाधान होण्यासारखे | नसून, एकादी मुद्देसूद गोष्ट, किंवा तत्तथा प्रमाण. अप्रयक्षप्रमाण, अथवा प्रत्यक्ष पुरावा रुजू केल्याशिवाय, ते कोणतीही गोष्ट गृहित धरणार नाहीत, हे खचित आहे. सबब, आतां आपण त्याच तजविजीस लागू, आणि लेखनकलेचे आह्मांच प्रवर्तक आहोत असे वाचकास दाखवून, पौरस्य व पाश्चात्य पंडितांच्या अभिप्रायांसमवेत ते आह्मी आपल्या अल्प समजुतीप्रमाणे सिद्ध करूनही देऊ. - सांप्रतकाळी, मद्रास इलाख्यांतील कृष्णा परगण्यांत, _ पुष्कळ शेधाअन्ती जे कित्येक नूतन इ. स. पूर्वी चव- । थ्या शतकांतील. शिलालेख उपलब्ध होत आहेत, | त्यावरून पाश्चात्य विद्वानांनी आपलें १ आमच्या वेदकालीन आर्यांची चांगली उन्नतावस्था होती, अर्से वेदावलोकनाने उत्तम प्रकारे व्यक्त होते. कारण, शेतिभाति, घरेदारे, किल्ले व नगरें, धनधान्य, वस्त्रप्रावरण, सोने, रुपे, तांबे आणि लोखंड, शस्त्र व अस्त्र, रथ आणि नौका, गाई व घोडे, वनस्पति आणि औषधे, इत्यादि सर्व कांहीं त्यांस माहित असुन, ते त्यांचा यथेष्ट उपभोगही घेत असत. इतकेच नव्हे तर, ऐहिकज्ञानाप्रमाणेच पारमार्थिक ज्ञानांतसुद्धा ते चांगले निष्णात होते, यांत बिलकूल शंका नाहीं. ( भारतीय साम्राज्य, पु. ४ थे पहा, )