पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/२१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शिक्षकाची नवी आचार संहिता


 डॉ. कलाम यांनी 'शिक्षक दिनी' शिक्षकांनी घ्यायच्या अकरा शपथा सांगितल्या होत्या. त्या शपथा एका अर्थाने 'शिक्षक व्रते' च होत. आजच्या शिक्षक दिनी प्रत्येक शिक्षकांनी ती 'एकादश व्रते' (अकरा व्रते) जीवन ध्येय म्हणून स्वीकारली तरी ते डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातले आदर्श शिक्षक होतील.
१. मी शिकवण्यावर जिवापाड प्रेम करीन नि शिकवणे हाच माझ्या जीवनाचा ध्यास राहील.
२. विद्यार्थ्यांना संस्कारित करणे इतकेच माझे कार्य नसून त्यांच्या तरुण मनास दिशा देणे ही माझ्या जीवनाची इतिकर्तव्यता असेल.
३. सामान्य विद्यार्थ्याला असामान्य बुद्धिमान विद्यार्थी बनवणे हे माझे जीवन ध्येय राहील.
४. मी विद्यार्थ्यांशी केवळ शिक्षकच नाही तर आई, बहीण, वडील, भाऊ या नात्याने वागेन.
५. मी जीवनात असा वागेन की, माझे जीवन हाच विद्यार्थ्यांना संदेश म्हणून प्रेरणा देत राहील.
६. विद्यार्थ्यात जिज्ञासा जागवून त्यांच्यात प्रश्न निर्माण करीन व प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य देऊन प्रोत्साहन देत राहीन.
७. मी विद्यार्थ्याशी जात, धर्म, लिंग, वर्ण, वंश, स्थिती यांचा विचार न करता सर्वांशी समान सौजन्याने वागेन.
८. मी माझ्या अध्ययन-अध्यापन कौशल्य, व्यासंगाचा सतत विकास करून माझे अध्यापन गुणवत्तेचे करण्याचा निरंतर प्रयत्न करीन.

नवे शिक्षण, नवे शिक्षक/२११