पान:देशी हुन्नर.pdf/93

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ८७ ]

श्मीरास तांब्याचीं खोंदीव भांडीं पुष्कळच होतात. त्यांजवरील नक्षी फार बारीक असून ती शाली वर असलेल्या नक्षीच्या धरतीवर असते. अमृतसरास एक सोन्याचें देऊळ आहे. त्याजवरील नक्षी तांब्या पितळेच्या भांड्यावर काढून ती साहेबलोकांस विकण्याची सुरवात झाली आहे याच जिल्ह्यांत जंडियाला नांवाच्या गांवीं स्वयंपाकाचीं भांडी फार तयार होतात. रिवारी व जगद्धि या गांवीं ओतीव भांडी फार तयार होतात. पेशावरास इराणी धरतीचीं भांडी पुष्कळ तयार होतात. दिल्लीस 'डेगची ' या नांवाचे मोठे भांडें तयार होत असतें. त्यास कोठेही सांधा नसतो. लहान लहान भांड्यांवर नक्षी करणाऱ्या लोकांस दिल्लीस चटेरे ह्मणतात. नाशीक येथें चरकावरील काम करणारे आपल्यास " थटेरे परदेशी " ह्मणवितात. हें लोक उत्तरकेडचेच आहेत. बहादरपूर गांवीं भांडयांचा मोठा कारखाना आहे. दसका या गांवाची तेथील प्याल्या बद्दल फार प्रसिद्धी आहे. भावलपूर येथें नक्षींचीं भांडीं होतात. जलंदर प्रांती फगवाडा या गांवीं झील दिलेली भांडीं तयार होतात.

 वायव्य प्रांतीं अयोध्येंत सुलतानपुरी व अज्जीमगड जिल्ह्यांत उमलीपर्दा या गांवीं साधीं भांडीं पुष्कळ होतात. नक्षीचीं भांडीं बनारस, लखनौ, मुरादाबाद झांशी, ललितपूर व गोरखपूर येथें होतात. बनारसेस या भांडयां शिवाय मूर्तिही फार होतात. बनारस येथील नक्षीचीं पितळेचीं भांडीं, मुरादाबाद येथील लाख भरलेलीं नक्षीचीं पितळेचीं भांडीं, व लखनौ येथील तांब्याचीं नक्षीचीं भांडीं यांस साहेबलोकांत गिऱ्हाईके पुष्कळ मिळत असल्यामुळें त्यांची हल्ली पुष्कळ भरभराट आहे. अनेक तऱ्हेचे वेगवेगळाले आकार त्याजवर चमत्कारिक तऱ्हेतऱ्हेची नक्षी व त्यांतही त्यांच्यावर चढविलेले सोन्यासारखें पाणी या कामांत बनारसच्या भांडयाची बरोबरी करण्याचें या देशांतील कोणत्याही गांवाचे सामर्थ्य नाहीं.

 मुरादाबाद येथील लाख भरलेली नक्षीचीं भांडींही हिंदुस्थानांतही इतर कोणत्याही गांवीं होत नाहींत. त्यांजवरील नक्षी करणारे लोक मुसलमान आहेत. त्यामुळे त्यांजवरील नक्षींत प्राण्याची चित्रें आढळण्यांत येत नाहींत. सन १८७६ सालापूर्वी या धंद्यास फारसे तेज नव्हतें. त्या साली तेथें सर एडवर्ड बक हे साहेब शेतकी खात्यावर मुख्याधिकारी झाले. त्यानीं अलहाबाद येथील एका ' हॉटेल' वाल्याची पुष्कळ विनवणी करून आपल्या विलायती खाणावळींत या भांड्यांचे नमुने विकावयास ठेवण्याचें कबूल करून घेतलें. त्या