पान:देशी हुन्नर.pdf/92

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ८६ ]

येथील चित्रशाळेचे मुख्य अधिकारी मेहेरबान ग्रिफिथ्स साहेब यांनी तांब्याचीं नक्षीचीं भांडीं करण्याचा नवीनच प्रकार काढला आहे. तांब्याचा मोठा रांजण तयार करून त्याजवर अजंटा येथील पांडव लेण्यांत दगडावर कोरलेली नक्षी विद्यार्थ्यांकडून ते काढवितात. व तें भांडें सोनाराकडून घडवून घेतात. यांत हिंदुस्थानांतील शुद्ध आकाराचें भांडें व त्याजवर अडीच हजार वर्षापूर्वी आमच्याच लोकांनीं काढलेली सर्वमान्य व खरोखरीच देशी नक्षी या दोहीचें एकीकरण होऊन तयार झालेलें काम पाश्चिमात्यांस अतिशय प्रिय झालें आहे. तें ३०० पासून ३५० रुपयापर्यंत विकतें. याचा एक नमुना पुणें प्रदर्शनांत आहेच. अमदाबाद येथील शहाअलम मशीद व राणी शिपरीकझोपडा" या नावानें प्रसिद्ध असलेली अत्युत्तम मशीद यावरील जाळीदार व कोंरीव नक्षी याचेही नमुनें याच साहेबानें तयार करविलें आहेत. त्यांतील दोन मोठाल्या खिडक्या व आठ जाळीदार पत्रे पुणें येथील प्रदर्शनांत आले आहेत.

 ह्मैसूर प्रांतीं देवाच्या मूर्ति, समया व हिंदुधर्मात मानलेले पूज्य पशु व पक्षी यांचें पुतळे तयार होतात. परंतु तें काम सुरेख नसतें. श्रावणी, बेल्लागोळा नागमंगल आणि मगडी हीं गांवें असल्या कामामध्यें विशेष प्रसिद्ध आहेत.
 पंजाब प्रांतीं तांब्यापितळेचीं भांडीं फार होतात. तिकडे स्वयपाक घरांतून भिंतीला फळ्या मारून त्यांजवर घरांतील पितळेचीं भांडीं चकचकीत घांसून लावून ठेवण्याची चाल आहे. व ज्या घरांत भांडी जास्ती तें मोठे व श्रीमंत घराणें असें मानलें जातें त्यामुळें भांड्यांची खरेदीही देशांत फार होते. चकचकीत ताट मांडून त्याच्यावर एक मोठी समईचें झाड ठेवून तिज भोंवती असलेल्या अनेक फांद्यावर लहान मोठीं पाळीं बसवून त्यांतील सर्व वाती एकदम लावून तयार केलेल्या दिपोत्सवाच्या झाडाबद्दल पंजाब प्रांताची पूर्वी प्रसिद्धी असे. परंतु अलीकडे 'घासलेटचें' दिवे जिकडे तिकडे प्रचारांत आल्यामुळें समयाची झाडे फारच थोडीं तयार होतात. हिमालय पर्वताच्या पंजाब प्रांती असलेल्या भागांत गुडगुड्या, दौती, कलमदानें वगैरे कांहीं जिनसा तयार होतात.
 अमृतसर, पेशावर, दिल्ली, जगदि, रिवारी, हुषारपूर, दसका, गुजरानवाल व " पिंड पतन खान " या गांवीं तांब्या पितळेचीं भांडीं पुष्कळ होतात. अमृत सर येथील भांड्यावर नक्षी खोंदून कल्हई चढवितात. हा प्रकार काश्मीरी आहे. व काश्मीरच्याच कांहीं लोकानीं येऊन तेथें दुकानें घातलीं आहेत. का-