पान:देशी हुन्नर.pdf/85

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ७९ ]

करितांना पहिल्यानें भांडयांवर ठसे मारून नंतर तीं हातोड्यानें ठोकितात. व त्यांजवरील नक्षी वरील उठवून दिसूं लागलीं म्हणजे मधली जागा नीट नेटकीं करून त्यांजवर खोंदणीनें बारीक बारीक दाणे उठवितात. शेवटीं मूर्तीवर रेखणी काम करून त्या नीट नेटक्या करितात. असलें काम बहुतकरूनगडव्यावर करण्याचा प्रघात ज्यास्ती आहे. त्यांजवर मेहेरपी काढून त्यांत मूर्ती उठवून अजूबाजूस वेलबुट्टी काढितात. हें फाम जवळ घेऊन पाहिलें असतां ओबड धोबड आहे असें कळून येतें परंतु दुर ठेऊन पाहिलें असतां फारच सुशोभित दिसतें. दुसऱ्या प्रकारांत ह्मणजे तांब्या पितळ्याच्या मिश्रणांत भांडी पितळेची केलेलीं असतात व त्यांजवरील नक्षी तांब्याच्या पत्र्याची केली असून ती नुसती लाकडाच्या पेटया करितांना कोंपऱ्यावर जशी फळ्यास कळाशी करावी लागते त्याप्रमाणें कळाशी करून बसविलेली असतें. तांबे व पितळ यां दोन्ही धातू धनवर्धनीय असल्यामुळें कळाशी बसण्यास लांकडी कामा सारखें खिळे मारावे लागत नाहींत. ती नुसती हातोड्यानें ठोकली ह्मणजे सांधली जाते. या कामांतही अखेरीस मूर्तीची रेखणी करावी लागतेच. या कामावरील नक्षी पितळेच्या घडींव भांड्यांवरील नक्षी सारखीच असते. परंतु ती जास्ती उचललेली असून पिवळ्या जमीनीवर तांबड्या रंगाची असल्यामुळें जास्ती उठून दिसते. तांब्याच्या भांड्यांवर चांदीचे पत्रीकाम हें अलीकडे होऊं लागलें आहें व हें दुसऱ्या प्रकारचाच एक पोटभाग आहे असें ह्मटलें तरीं चालेल. मात्र चांदी जास्ती मौल्यवान असल्यामुळें व तिचा अंगी धनवर्धनीयता तांब्यापेक्षां जास्ती असल्यामुळें मूर्ति विशेष सुरेख उठतात. व त्या साहेब लोकांत खपतात, ह्मणून त्याजवर महेनतही जास्ती केलेली असते. ही भांडीं जुनीं झालीं ह्मंणजे तांब्याची व चांदीची झांक नाहीशी होऊन ती विशेष सुशोभित दिसतात. उत्तर अर्काट जिल्ह्यांत तिरुपट्टी गांवी पितळेच्या भांड्यावर ठसे मारून उठविलेल्या नक्षीत तांब्याचें व चांदीचें पातळ पत्रे बसवून तें ठोकून कळाशी प्रमाणें बसवितात. या कामांतील पत्री नक्षी टिचणीनें कातरलेली असते. नाशीक क्षेत्राप्रमाणें तिरुपट्टीही मद्रास इलाख्यांत एक प्रसिद्ध क्षेत्र आहे तेथें जाणारी यात्रेकरू मंडळी असल्या प्रकारची भांडीं खरेदी करितात. त्यामुळें त्या धंद्यास बरीच तेजी आहे."

कुफ्तगारी काम.

 कुफ्तगारी काम ह्मणजे लोंखडाच्या भांड्यांवर बारीक नक्षी