पान:देशी हुन्नर.pdf/45

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ३९ ]

 तूरी--चौघड्यांत नगाऱ्याबरोबर वाजवीत असतात त्या एका जातीच्या कर्णाचें हें नांव आहे.

 शरणौ--बकऱ्याच्या कातड्याच्या पिशवींत वारा भरून बगलेंत धरून वाजविण्याचें स्काटलंडांतील बॉगपाइपसारखे हें एक वाद्य आहे.

 थुत्थी--हें एक वरच्याच वाद्यासारख वाद्य आहे. असल्या तऱ्हेचीं कातड्याच्या पिशवीचीं वाद्यें हिब्रू, ग्रीक, रोमन, अरब, इराणी, आणि हिंदु या लोकांत फार प्राचीन काळापासून आहेत. व हल्लींही इटली, फ्रान्स, जर्मनी, रशिया व पोलंद याठिकाणी असली वाद्यें अजून आढळतात. स्काटलंड देशांत तर हें वाद्य सर्व घरोघरीं आढळते.

 शंख--शंकराचा पांचजन्य व विष्णूचा देवदत्त त्यांची हीं धाकटीं भावंडें होत. बौध्य धर्माचेही लोक शंख वाजवितात. जंगमाचें तर हें उदरनिर्वाहाचें साधन आहे.

 गोमुख--हा एका जातीचा गाईच्या तोंडासारखा एक शंख आहे.

 बरतक-- हा कवडीच्या जातीचा एक शंख आहे.

 तुंब्री--ही गारोड्याची पुंगी. इलाच नागसूर असेंही ह्मणतात.


आघातवाद्यें.

 मंदिरा–-हें टाळाचें नांव आहे. याला उत्तरहिंदुस्थानांत झोरा व कैनै अशींहीं नांवें आहेत.

 करताळ-- याला उत्तरहिंदुस्थानांत चिना किंवा झाजी म्हणतात. व बंगाल्यांत खटाली असेंही नांव आहे.

 घंटा--हें सर्व प्रसिद्ध वाद्य आहे.

 घुंगुर-- याला बंगाल्यांत ताली म्हणतात.

 झांज--हें एक प्रसिद्ध वाद्य आहे.

 तास--हें असूरी वाद्य आहे. ब्रह्मदेशांत असलेंच एक वाद्य आहे तें दिसण्यांत मोठ्या परातीसारखें असून त्याच्या मध्यभागीं झांजेच्या गोळ्यासारिखा एक मोठा गोळा असतो. ह्या गोळ्यांवर लांकडाने किंवा लाकडाच्या टों-