पान:देशी हुन्नर.pdf/43

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ३७ ]

सारखा आहे. हें युरोप खंडांतील ज्यू लोकांच्या 'हार्प नांवाच्या ' वाद्यासारखें आहे. फ्रान्सदेशांत याला “ट्रोपं" ह्मणतात. स्काटलंडांत 'ट्रम्प' व इंग्लंडांत जाॅयट्रम्प [ ज्यूट्रम्प] असे म्हणतात. हें वाद्य जरी मुलाच्या खेळण्यासारखें अगदी लहान आहे तरी त्याजवर पुष्कळ तऱ्हेचे सुर काढितां येतात.

 तुंबर किंवा तुंबरविणा--स्वर्गीच्या तुंबर नांवाच्या देवापासून ह्या नांवाची उत्पक्ती आहे. हें वाद्य तुंबराने शोधून काढलें असें ह्मणतात. यावाद्यास आपण ' तंबुरा 'असें म्हणतों. तंबुरी अबिसीनिया व इजिप्त देशांत प्राचीन काळापासून आहे असें डाक्तर बिडी साहेबांचे ह्मणणें आहे.

 आनंद लहरी--याला आपण तुणतुणें ह्मणतो, हें वाद्य फार करून भिकारी लोकांच्या हातीं असतें.

 सारिंदि--हें उत्तर हिंदुस्थानांतील हलक्या प्रकारच्या एका सारंगीचें नांव आहे.
 एकतारा--बंगाल्यांतील वैष्णव लोक भिक्षा मागतांना हे वाद्य वापरतात. ही आमची किनरी असावी असें वाटतें.

 गोपीयंत्र–-हेंही किनरीच्याच जातीचें एक वाद्य आहे.

 चारतारा-- या वाद्यांतील तीन तारा पितळेच्या व एक तार पोलादी असते.

 कानून-- या वाद्याला तेवीस तारा असतात.

 तीड किंवा ताड–-हें देवद्वाराच्या लांकडाचें केलेलें एक चारतारी वाद्य आहे. हे पंजाबी वाद्य आहे.

 दोतारा–-हें चार तारासारखें आहे. परंतु त्याचा दांडा त्या वाद्याच्या दांड्यापेक्षां जाड असून आंखूड असतो.

 चिक्कारा–-हें पंजाबी वाद्य आहे. याला घोड्याच्या केसाच्या तारा लावितात.

 कमाणची--हें काश्मीरी वाद्य आहे.


सनईच्या जातीचीं वाद्यें.

 बन्सी--उत्तरहिंदुस्थानांत वेणु या वाद्याला बन्सी ह्मणतात. त्यालाच