पान:देशी हुन्नर.pdf/42

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ३६ ]

 सुरशृंगार--हा महती, कच्छपी व रुद्रविणा या तिन्हीपासून प्यारखान नांवाच्या मनुष्याने तयार केला आहे.

 रुद्रविणा-- यास इराण व आफगाणिस्थान या देशांत 'रबाब' ह्मणतात. व अरबस्थानांत ' रुवेब ' ह्मणतात. स्पेन देशांतील 'मांडोलियन ' नावाच्या वाद्यांशी याचे पुष्कळ साम्य आहे.

 सरोद--याला बाजूला सात पासून अकरापर्यंत तारा असतात.
 अलाबू सारंगी--हे वाद्य फार प्राचीन काळचें आहे. याला युरोप खंडांत 'इंडियन व्हाओलिन ' म्हणतात व मुसलमान लोकांनी त्यास 'कमरच्या' असें नांव दिले आहे.

 मीन सारंगी--हें वाद्य तौंंओैसासारखे असतें व याच्या टोंकावर माशाची ( मीन ) आकृती काढलेली असते.

 नाद तरंग--हें वाद्य इसरार किंवा तौंस या वाद्यांसारखेंच परंतु कांहींसें मोठें आहे.

 सारंगी--हिचा अवाज जनानी अवाजाशीं मिळता आहे. व त्याचा उपयोगही नाचांत ज्यास्ती होतो. हें वाद्य लंकेच्या रावणांने शोधून काढिलें असें म्हणतात. बाॅडन पॉवेल साहेबांचे असें म्हणणें आहे कीं, 'सारंगीचा अवाज कर्कश व त्रासदायक आहे.'

 सूरसंग--बंगाल प्रांतांतील वान्कुरा जिल्ह्यांत विष्णुपुर गांवीं प्रगट झालेल्या सेवा रामदास नांवाच्या मनुष्यानें हें वाद्य प्रथम तयार केलें असें ह्मणतात,

 स्वर विणा-- याला सुरबिन म्हणतात. हें वाद्य प्राचीन काळचें आहे. ते विख्यात रुद्र विण्यासारखें आहे.

 सरवथ--हें मद्रास इलाख्यांतील एका वाद्याचें नांव आहे. तें दिसण्यांत पांखरासारखे दिसतें. त्यास सहा खुंटया असतात व त्याची उत्पत्ती ताऊसापासून झाली असावी असें वाटतें.

 ताऊस किंवा मयूरी--या वाद्याचें नांव संस्कृत 'मयूर ' व फारशी ताऊस व मराठी मोर या निरनिराळ्या भाषेंतील एकाच शब्दापासून आलें आहे.

 महा तंबुरा--हा तंबुऱ्याचाच प्रकार असून त्याच्यापेक्षां फार मोठा असतो.
 माचंग अथवा मोरचंग--हें फार जुनें वाद्य आहे. याचा आकार त्रिशूळा-