पान:देशी हुन्नर.pdf/203

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ २०५ ]

 ब्रह्मदेशांत कशिद्याचें काम फक्त नाटकवाल्यांच्या कपड्यावर मात्र दृष्टीस पडतें. कशिद्याच्या संबंधानें एक दोन गोष्टी वर्णन करण्याजोग्या आहेत.

 कच्छ व गुजराथ प्रांतीं व पंजाबांत गुरगांव येथें पोतीची किंवा शिंंप्यांची नक्षी कशिद्यासारखी शिकून करंडया व चुंबळी तयार करितात. गुजराथी लोकांत दरवाज्यावर बांधण्याकरितां पोतीची तोरणें तयार करण्याची चाल आहे.

 भावनगरास व ब्रह्मदेशांत रंगारंगाच्या कापडाचें तुकडे घेऊन तें वेलबुट्टीसारखे कापून एका कापडावर सारखें लावून नंतर शिवून टाकण्याची चाल आहे. मुंबई इलाख्यात अशा रीतीनें तयार केलेल्या बैलांच्या झुली कोठें कोठें दृष्टीस पडतात.

 ब्रह्मदेशांत असलें काम "केमेनडाईन' गांवीं फारच चांगलें तयार होते. दहा बारा फूट लांब व चार पांच फूट रुंद तांबड्या सखलादीचा तुकडा घेऊन त्याजवर रंगारंगाच्या सखलादीचीं पुरुषांचीं व स्त्रियांचीं चित्रें कातरून बसवून तीं शिवून टाकतात व त्यांस नाक, डोळे, व दागदागीनें सोडवून ते तयार करितात. अशा रीतीनें तयार केलेल्या पडद्यांवर आमच्या चित्रपटांप्रमाणें पुराणांतील देखावे काढून तीं आपल्या घरांत टांगण्याची ब्रह्मदेशांत वहिवाट आहे.

 आमच्या देशांत छकड्याच्या किंवा रथाच्या ताटीवर कप्याची नक्षी करीत असत, त्याप्रमाणें ब्रह्मदेशांतही चाल आहे.

गालीचे व सत्रंज्या.

 हिंदुस्थान देशांत गालीचे पूर्वी होत नसत. गालीचे करण्याची विद्या इराण देशांतून मुसलमान लोकांनी बगदाद, सिराज, व समर्कंद येथोन हिंदुस्थानांत आणली.

 जयपूर येथील महाराजांच्या दरबारी माहाराजांच्या पूर्वजांनीं १५० वर्षापूर्वी अफगाण देशावर स्वारी केली होती त्यावेळीं तेथून आणलेला एक गालीचा आहे, त्याजवरील काम मोठे तारीफ करण्यासारखें आहे. हा गालीचा हल्लीं अगदीं फाटून गेला आहे, तत्रापि त्याच्यामागें जाड्या कापडाचें अस्तर लावून तो ज्यास्ती न फाटावा ह्मणून त्याचें तुकडे ताकडे जेथल्या तेथें शिवून