पान:देशी हुन्नर.pdf/204

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ २०६ ]

तो मोठ्या जतनेनें सांभाळून ठेविलेला आहे. हा गालीचा कलकत्ता प्रदर्शनांत महाराजानें पाठविला होता.

 मुंबई इलाख्यांत हल्लीं गालीचे कराची व अमदाबाद यागांवीं तयार होतात; तरी या देशांत तयार होणार बहुतेक गालीचे तुरुंगांत विणलेले असतात. पुण्याजवळ एरवडे येथें सरकारी तुरुंग आहे तेथें व ठाणें, कराची, आमशाबाद, भागलपूर, बनारस, अलाहाबाद, आग्रा, फत्तेगड, दिल्ली, लाहोर, मुलतान, रावळपिंडी, इत्यादि तुरंगांत विशेष चांगले काम होतें. तेथे विजापूर वगैरे प्रसिद्ध राजधान्यातील जुन्या गालीचें तुकडे आणून ठेविले आहेत तें पाहून नवीन काम तयार करितात.

 वायव्य प्रांतांत मिरझापूर, बरेली, मुरादाबाद, बुलंदशहर, बारबंकी,व झाशी, यागांवीं गालीचा विणणारे लोक आहेत. तसेंच पंजाबात, मुलतान व अमृतसर गांवीं व निजामशाईत वरंगळ व हमामकुंडा गांवीं व मद्रास इलाख्यांत अडाणी,वडवेदी, गांवींही गालीचे विणणारे लोक आढळतात.

 उत्तर हिंदूस्थानांत मिरझापूर येथील बाबू वेणीप्रसाद, व अमृतसर येथील व्यापारी देवीशाई आणि चंबामल यांची गालीचे तयार करविण्याच्या कामांत प्रसिद्धी आहे. अमृतसर येथील गालीचे विणणारे लोक काश्मिरचे राहाणारे आहेत.

 मिरझापूर, आलाहाबाद, लखनौ, फत्तेगड, व झांशी, या गांवीं गालिच्यासारखी लहान लहान आसनें तयार करितात.

 भेरा, व देरागाझीखान, या गांवीं, बलूची लोकांच्या बायका एका प्रकारचीं चवाळीं विणितात. तशींच महाराष्ट्र देशांत वणजारी लोकांच्या बायकाही विणीत असतात.

 लोकरीचे बुरणूस तयार करून त्याजवर रंगारंगाची लोकर चिकटवून गालिच्यासारखी नक्षी वटविण्याचा पंजाबप्रांती व जयपूर संस्थानांत प्रघात आहे. काश्मिरांतही असले बुरणूस तयार होतात.

 काश्मिर देशांतील शाल विणणारे लोक अलीकडे गालीचे विणूं लागले आहेत. जबलपुरास पूर्वी गालीचे तयार होत असत. परंतु अलीकडे तेथील धंदा अगदी बुडाला,