पान:देशी हुन्नर.pdf/154

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १५६ ]

पडते असें नाहीं. मणिपूर संस्थानचे आसपास नागा या जातीचे लोक आहेत ते हल्लीं आपल्या बायकांस शेतकीच्या कामाकडे लावूं लागल्यामुळें त्यांस कापड विणण्यास फुरसत सांपडत नाहीं. यास्तव मणिपूर येथील लोकांकडून त्यांस कापड विकत घ्यावें लागते, व मणिपुरास नागा लोकांचे उपयोगी पडण्यासारखें कापडही तयार होऊं लागलें आहे.

 असाम व मणिपूर या देशांप्रमाणें ब्रह्मदेशांतही कापड तयार होतें. ब्रह्मदेशांत कापड विणण्यास त्याच देशांत उप्तन्न झालेला कापूस वापरतात. कापसांतील सरक्या काढून साफ केला ह्मणजे त्याचें सूत तेथें विलायतेंत पूर्वी जसें सूत कांतीत असत त्याप्रमाणेंच कांततात. ब्रह्मी लोकांचे मागही विलायतेंतील प्राचीन मागांसारखेच आहेत. तद्देशीय कापड जाडें भरडें असतें परंतु तें इतर देशांतील कापडापेक्षां जास्ती टिकाऊ असतें. अलीकडे विलायती रंगाच्या भबक्यास भुलून तेथील कांहीं तरुण लोक विलायती कापड वापरूं लागले आहेत.

रेशमी कपडे.

 रेशमाचा शोध पहिल्यानें चीन देशांत लागला असें जरी आहे तरी तो शोध लागल्यापासून तें हिंदुस्थानांत लौकरच प्रसिद्ध झालें. तरी वेदांत रेशमाचा कोठें उल्लेख नाहीं असें पाश्चिमात्य विद्वानांचें ह्मणणें आहे. रामायण आणि महाभारत हे दोन ग्रंथ लिहिण्यांत आले त्या वेळीं रेशीम आपल्या देशात पुष्कळ वापरीत होते असें दिसून येतें.

 रेशमाच्या मुख्य जाती चार आहेत-१ पहिलें-तुतीच्या झाडावर राहणाऱ्या किड्यांपासून उत्पन्न झालेलें त्यास 'मलबरी ' रेशीम असें ह्मणतात. पीतांबर, मुकटे, पैठण्या, इत्यादिक कपडे, त्याच रेशमाचे होतात. २-दुसरें ‘टसर ' या नांवानें प्रसिद्ध आहे. याचा रंग तपकिरी रंगासारखा असोन तें रेशीम कितीही धुतलें तरी पांढरें होतें.याचें कापड थोडें जाड होतें तें पारशी वगैरे लोक आपले अंगरखे व विजारी करण्यास वापरतात. ३ तिसरें-‘ एरी ’ हे एरंडाच्या झाडावर राराहणाऱ्या किडयांपासून उत्पन्न होतें ४ थे 'युगा' या नांवाचें आहे. तें आसाम देशांत उत्पन्न होतें. या दोन्ही जातींच्या रेशमाचा उपयोग, मेमण जातीच्या लोकांच्या पागोटीं, आंगरखे व सदरे यांवर कशीदा वगैरे कामीं करितात. ब्रह्मदेशांत आणखी एक पांचव्या प्रकारचें रेशीम तयार होतें त्यास 'कायक्यूला'