पान:देशी हुन्नर.pdf/153

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १५५ ]

निजामाच्या राज्यांत रायचर येथें हलक्या प्रतीची मलमल तयार होते तिला कधीं कधीं खाकी रंगही देतात. उन्हाळ्यांत या मलमलीचे पुरुषांकरितां सदरे व बायकांकरितां चादरी करण्याची त्या देशीं चाल आहे. या पेक्षा चांगल्या प्रतीची मलमल नांदेर येथें होते.

 असाम प्रांती सूत कातण्याचें व कापड विणण्याचें काम घरोघरी होतें व तें बायका करितात. हिंदुस्थानांतील इतर प्रांतांप्रमाणें त्या प्रांती विलायती सुत येऊं लागल्यामुळें जाडे भरडें कापडें विणण्याकरितां मुद्दाम कांतविलेल्या सुताशिवाय देशी सूत मिळत नाहीं तरी त्या देशी उत्पन्न होणारा कापूस बहुशः तेथेंच कापड विणण्यास खपतो. साधीं धोतरें, चादरी, रुमाल व पलंगपोस हे जिन्नस त्या देशीं विशेषेंकरून विणले जातात. कधीं कधीं कांठाचीं धोतरेंही विणतात. चादरी, कधीं साध्या व कधीं खासगी खर्चाकरितां बारीक मलमली सारख्या काढून त्यावर कशिदाही काढतात. “ बरकापर" या नांवाचें अंगावर घेण्याचें शालीसारखें एक प्रकारचें कापड तेथें तयार करितात व तसेंच " खनिया कापर" या नांवाचें बारीक वस्त्र विणून त्याच्यावर कशिदा काढून तेंही शालीप्रमाणें वापरतात तें आंखूड व अरुंद असलें ह्मणजे त्यास 'चेलेंग' ह्मणतात. असाम प्रांतीं अतिशय च बारीक कापड निघतें त्यास 'परिडिया कापड़ ' असें म्हणतात.

 हिंदुस्थानच्या ईशान्येकडील सरहद्दीवर मणिपूर ह्मणून, एक संस्थान आहे, त्यांतही असाम देशाप्रमाणें घरोघर कापड विणण्याचे माग आहेत. जाड्या भरडया सत्रंज्यांपासून तो अतिशय बारीक मलमलीपर्यंत सर्व जातीचें कापड या संस्थानांत तयार होतें. प्रत्यक्ष महाराजांच्या राण्या व कन्या आदिकरून सर्व गोर गरीबांच्या स्त्रिया ह्या तेथें कापड विणण्याचें काम करितात. त्यांत लहानसहान मुली आपल्या अल्पवयींच तें काम शिकून त्यांत हुशार होतात. मोठ्या श्रीमंत घराण्यांतल्या बायका जें कापड विणतात तें केवळ घरखर्चाकरितां इतकेंच नाहीं तर तें तयार करून विकतातही. त्यांणी विणलेलें जाडें कापड विलायती कापडापेक्षां स्वस्त असतें, परंतु त्यांचें बारीक कापड मात्र माहाग पडतें. हें बारीक कापड विणण्याकरितां हल्लीं तेथें विलायती सूतच वापरूं लागले आहेत. मणिपूर येथील कापड स्वस्त असण्याचें कारण असे आहे कीं त्या देशांतील बायका आपला वेळ आळसांत फुकट न घालवितां फावल्या वेळीं सतत उद्योग करून कापड विणून तयार करितात. त्यामुळें त्यास मजूरीच