पान:देशी हुन्नर.pdf/139

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १३३ ]

 काचारी लोकांची भट्टी लहानशा वेगळ्या झोपड्यांत किंवा पडवींत असते. झोपडें सुमारें वीस फूट लांब व पंचवीस फूट रुंद असून त्याची भिंत १० फूट उंच असते. त्याच्या भिंती मातीच्या असतात. त्याला दक्षिणेस व पश्चिमेस दरवाजे असतात. व उत्तर दक्षिण आणि पश्चिम या तीन दिशेस दोन दोन खिडक्या असतात. पूर्वेकडील बाजू अगदीं बंद असते. घरावर कौलेंच पाहिजेत. पेंढा वगैरे ज्वाला ग्राही पदार्थ चालत नाहींत. घरांतील मधला खांब सुमारें वीस फूट उंच असतो. भट्टी घराच्या मध्यभागीं कोठें तरी असते. भट्टी करण्याकरितां तीनचार फूट खोल खाडा जमिनींत खणतात, त्या खाड्यावर देवळाच्या घुमटाप्रमाणें मातीचा घुमट बांधितात. घुमटाच्या सभोवतीं कमानीसारख्या चार इंच रुंद व सहा इंच उंचीच्या खिडक्या पाडितात. घुमटाच्या शिखरावर भोंक असतें, त्याजवर मातीचाच झडपा असतो. घुमटाच्या आंत व खळग्याच्यावर एक सज्जा असतो,त्याच्यावर प्रत्येक खिडकीच्या समोर एकएक मूस ठेवितात. घुमटाच्या बाहेर दोन खिडक्यांच्यामध्यें एक असे सहा उभे दांडे मारिलेले असतात, व त्यांजवर आडव्या सहा दांड्या बांधितात. अशा ह्या षड्कोनी मांडवावर दोन तीन फुट जाडीचा थर होई अशा झाडाच्या ताज्या फांद्या सुकत टाकितात; त्यामुळें रानांतून आणलेलीं ओलीं फांटीं सुखविण्याची सोय होते व जागाही थंड राहते. प्रत्येक खिडकी समोर दोन उभ्या दांड्या पुरुन त्यांजवर एक आडवी दांडा बांधून तिच्यावर फाटक्या गोधडीचा तुकडा टाकलेला असतो त्यामुळें खिडकीसमोर बसणाऱ्या कारागिराचें डोकें तापत नाहीं. या प्रत्येक किडकीसमोर एकएक मनुष्य आपलीं हत्यारें व फुटक्या बांगड्यानी भरलेली एकएक टोपली घेऊन बसतो. खिडकीसमोर ठेविलेल्या मुशींत कांचा घातल्या ह्मणजे भट्टीच्या खाली ठेविलेल्या भौकांतून तीत फांटी घालून ती पेटवितात. भट्टी पेटवून सुमारे एक तास झाला म्हणजे कांच वितळू लांगते. व कारागिरही कामाची सुरुवात करितात. त्यांतील प्रत्येक जण आंकडीनें कांच ढवळून सारखी पातळ झाली किंवा नाहीं हें पाहतो. पातळ झाली ह्मणजे सळईनें त्यांतील एक वाटाण्या येवढा गोळा घेतो. गोळा भट्टींतून बाहेर काढला म्हणजे सळईस फिरकी सारखा हिसका देतो त्यामुळें त्या गोळ्याचा फुगा होतो. या सळईस पट्यानें झटकन् फटका मारिला म्हणजे गोळ्याची आंगठी होते. पट्यानें वरचेवरसळईस ठोके देऊन आंगठी लांबवून तिची सांखळीच्या कडीसारखी उभोंडी कडी होते. आपल्यास जरूर आहे इतकी मोठी ही कडी झाली ह्मणजे