पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/381

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३४ ) अहंकार काम क्रोध मांग ॥ मदमत्सराचे धावति निलाग । तेणें हातिच्या हाती अंतरला श्रीरंग वो ॥ ५॥ ऐसे चुकवुनी आघात अपार । आज सांपडलें भाईते भांडार ॥ तेणें झालिये वो निजसुखें निर्भर । निळा ह्मणे भोगू सुखाचे संभार वो ॥ ६ ॥ ॥ १५३६ ॥ होतें बहुत दिवस आर्त वागविलें । आजि अकस्मात ते फळ देऊ आलें ।। दृष्टि श्रीहरिची देखील पाऊलें । घेतले जन्म मागे सार्थक याचें झालें वो ॥ १ ॥ धन्य हे आनंदाच सांपडली वेळ । तेणें मंत सजन भेटले कृपाळ ॥ याणि फेडियला बुद्धीचा वो मळ । दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ वो ॥२॥ नाना साधनाच्या केलिया खट- पटा । पार या न पचति' ची वो याच्या दारवंदा ॥ जाणो जाता जाणिव घालि आडफांटा । योगाभ्यामें सिद्धी रोधीताती वाटा वो ॥२॥ यज्ञयागें स्वर्गभोग आड येती । करितां तपें काम क्रोध खवळती ॥ निया- नियज्ञाने अभिमान वाढती । करितां तिर्थाटणे अहंकाराचि चि प्राप्ती वो ॥ ३ ॥ जपतां मंत्री चळचि घाली घाला । करितां दान धर्म पु भोगवितो फळा ॥ सांवळे मिरवितां विधि निषेध आगळा । आतां हेंचि बरवें धणी पाहों याला वो ॥ ४ ॥ ऐसे शोधियले मार्ग नानापरी । न येती प्रतीति मग सांडियले दुरी ॥ आतां गाउनि गीत नाच हा मुरारी । निळा ह्मणे करु संसारा बोहार वो ॥५॥ | ॥ १६३७ ॥ आजि पुरलें वो थातीचे आरत । होतें हृदयीं वो बहु दिवस चिंतित ॥ मना अवरुनि इंद्रियां सतत । दृष्टि पाहों हा धणि वरि गोपिनाथ वो ॥ १ ॥ तेंचि घडोनियां आलें अनायासे । जाता यशोदे घरा वाणाचिया मिसें ।। आला खेळत खेळत चाळवेपें । कवळि घालि मिठी गद्दा हांसे वो ॥२॥ मुख अमृताचा मयंक उगवला । दंत हि-याचा प्रकाश फाकला ॥ नयनीं रत्न की तारा वो झमकली। देखता हृदयीं निज वाम याचा झाला वो ॥ ३ ॥ जन्म जन्मांतरीं वहु केले सायास । याचे भेटिलागीं व्रतें उपवास ॥ सेविली गंगेची तटाकें उदास । याचिया मुकुताचे अाले नेणो घोर वो ।। ४ । आजि आनंदाशी आनंद झ्या झाला । अनि सुखाशीं सुखें लाभ केला ॥ आजि हर्षाशीं है५ भेट आला । तेणें श्रीरंग निज दृष्टी स्थिरावला वो ॥ ५ ॥ भोग भोगितां वो