पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/328

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २८७ ) ॥ १४०५ ॥ देव इसोनि बोलती । नको येऊ काकूलती ॥ १ ॥ आम रंजवू आपणीयां । तुझीये वाचे चेतनीय ॥ २ ॥ नलगे का परिसर । देणे तुज धरी धीर ॥ ३ ॥ निळा अणे चरणावर माथा । ठेउनी करी पुढे कथा ॥ ४ ॥ ॥ १४०६ ॥ न धरीं आतां शंका । काशासाठी भेऊ लोकां ॥ १ ॥ उयाचे अझै तयावरी । मज हे ऐसी काय थोरी ॥ २ ॥ सांगीतलें कर का ! ज्याची तया चिता लाज ॥॥ निळा सणे गेला भेवो । जाणोनि मासे पंढरिरावो ॥ ४ ॥ ॥ १४०७ }} होवोनियां निश्चळ । स्थीर राहिल अढळ ॥ १ ॥ नाहीं भय शंका मन । विश्वास मानियेला वचन ॥ ३ ॥ ज्याचें तया पुढे । बोलेन वेढे हो वाकडें ॥ ३ ॥ निळा अणे देवें । वदवीळे ते घदेन भावें ॥ ४ ॥ | ॥ १४०८ ॥ चित्त ठेउनि पायावरि । रूप धरुनियां अंतरीं ॥ १ ॥ मुखें याच्या नामावळी । आठवीन नियकाळ ॥ २ ॥ करीन ऐसाची कैवाड । शंका येऊं नेदी आड ॥ ३ ॥ निळा अणे दिवसराती । तुझा आठवीन श्रीपती ॥ ४ ॥ | ॥ १४०९ ॥ वरा केला अंगीकार । माझा तुझी घेतला भार ॥ १ ॥ नाहीं तरी जात वायाँ । नाना योनि भोगावया ॥ २ ॥ गाईन पावर घोखाडे । तुमचे कीर्तीचे पवाडे ३ ॥ निळा सणे ध्यान चित्त । अनि राईन तुमची मूर्ती ॥ ४ ॥ ॥ १४१० ॥ नपड़े अति दीवसराती । विसर तुमचा श्रीपती ।। झाली इंद्रियां विश्रांति । रंगली नाम चितनें ॥ १ ॥ बदन सुंदर तुमचे नाम । डोळियां रू५ मेघश्याम ॥ श्रवण ऐकतां उत्तम । गुण तुमचे गोविंदा ॥ २॥ हाते वाजवीता टाळी । चरणे नृय कथाकाळीं ॥ गोजिरें भ्यान हृदय कमलीं । तेंची उसाचानि राहीलें ॥ ३ ॥ मस्तक ह्मणे चर गावरी । माझा ठाव निरंतरीं ॥ जिव्हा रंगली नामोच्चारी । न राहे क्षण- भरी आठवीतां ॥ ४ ॥ निळा ह्मणे माझा हेत । होउनी ठेला मुद्रांकित ॥ सदासर्वदा गाउँ गीत । हैं चि चितुनि राहीला ॥ ५ ।।