पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/319

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २७८ ) |॥ १३५२ ॥ नवल चि एक वादे मज । कैसे गुज अनुवादों ।। १ ।। आपुली आपण बाईल झाला । आपण चि व्याला आपणासी ॥ २ ॥ मागे पुढे एकला एक । दाविले अनेक परी मिथ्या ॥ ३ ॥ निळा म्हणे हा चराचरा । वसवू अंतरा बाहेरी ॥ ४ ।।। ॥ १३५३ ॥ कैची याला चाईल आई । नामरूप तें ही लटिकेंचि ॥ १ ॥ मूळ चि नाही डाळ ते कैचे । लटिके माचे काय म्हणों ॥ २।। हात पाय नाक ना डोळे । देखणे आंधळे नातले चि ॥ ३ ॥ निळा म्हणे कांहीं चि नव्हे । तोचि हा अवचे श्रुति बोले ॥ ४ ॥ | ॥ १३५४ ॥ मत्याक्षरे माझी वाणी । प्रवर्तली गुणी तुमचया ॥ १ ॥ दाविले ते तुम्ही अर्थ । बोळी यथार्थ मांडियेले ॥ २॥ नाहीं कांहीं । मतांतरीं । वदली वैखरी हे माझी ॥ ३ ॥ निळा म्हणे हे वाक्य पृजा । गरुडध्वजा प्रीत्यर्थ ॥ ४ ॥ ॥ १३५६ ॥ जिकडे तिकडे चाले रवी । प्रभा नीच नवी सांगावें ॥ १ ॥ तैसे केले माझे चाचे । तुम्ही सामथ्र्याचे बोलणे ॥२॥ उजळल्या दाही दिशा । करुनी प्रकाश निजवथें ॥ ३ ॥ निळा ह्मणे सया चाली। वाट दाविली तुम्ही ते ॥ ४ ॥ | ॥ १३५६ ॥ माझे चि मज नवल वाटे । मी चि भेटें मजलागीं ॥ १ ॥ निजात्मवोधे उदो केला । प्रकाश दादा कोंदोनी ॥ २ ॥ कोठे कांहीं चि न दिसे दुजे । निजात्मतेजें जग भासे ॥ ३ ॥ निळा ह्मणे अवघे ठायीं । मी चि नाहीं दुजी परी ॥ ४ ॥ | ॥ १३५७ ॥ पाहाणे पाहाते । गेले हारपोनियां निरुते ॥ १ ॥ मी हि नाहीं तेंहि नाहीं । आप आप अंतरवाहीं ॥ २॥ उदो अस्तु सविता नेणें । जेथे तेथे आपुलेपणे ।। ३ ।। निळा ह्मणे नभ नभ। जेवी दाऊनियां प्रतिबिंब ॥ ४ ॥ ॥ १३५८ ॥ एकापासुनी झालें विश्व । विश्वामाजी एक चि अंश ॥ १ ॥ जैसे शून्यापासुनी अंक । झाले भांदितां नुरे चि लेख ॥ २ ॥ शून्या नुठित शून्यपणें । कैंचें एकाएक होणें ॥ ३ ॥ निळा ह्मणे भक्त चि नाहीं । कंचा देव ही तये ठायीं ॥ ४ ॥ ॥ १३५९ ॥ विश्व अवधैं मायाभास । माया ब्रम्हीं नाहीं चि भोस