पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/318

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २५७ ) याय पंचभौतिक } आत्मा सुकळां व्यापक एक ॥ ३ ॥ निळा आणे गुण बटणी । योनी विभाग चवर्णी ॥ ४ ॥ | ॥ १३४६ ॥ शुद्ध सात्विक ब्राह्मण । सत्व रज मिश्रित क्षत्रया जाण ॥ १ ॥ रजतमे वैश्य निर्माण । शुद्रा तमो गुण निर्मीता ।। २ ।। नाना याति माना भेद । यांपासुनी शाखा विविध ॥ ३ ॥ निळा ह्मणे निषिद्ध तम । अनामिकादि पापकर्मी ॥ ४ ॥ ॥ १३४७ ॥ अवर्षे टाळूनी निमित्त । वरुनी बोलत आपणा ॥ १ ॥ ' ऐसी करितो हरि लाघवें । सर्वं हि ठावें सर्वज्ञा ॥२ ।। बुद्धि बुद्धीचा हा जानता । स्फूर्ति प्रसविता स्फूर्तीचा ॥ ३ ॥ निळा ह्मणे आपुल्या गोड । तया आवडी स्तवनाची ॥ ४ ॥ | ॥ १३४८ ॥ नेणोनि पारिखे । अत्मिा आपणा न देखे ॥ १।३ न देखोनि दुजें कहीं । अपिआप असे पाहीं ॥ २ ॥ नामा रूपा येणें । नाहीं होणे ना निमणे ॥ ३ ॥ निळा म्हणे नव्हे जागे । निज स्वप्न ना वाउगे ।। ४ ।। | ॥ १३४१॥ कांही चि नहोनि विस्तारला । बहुरूपी हा एकला ॥ १ ॥ नवल विचित्र हैं चि वाटे। कैसा नटोनि ठेला नटें ॥ २ ॥ एका ऐसा नहोनी एक । नानाकारे हा अनेक ॥ ३ ॥ निळा म्हणे न लायकी ।। शेख वेगळा गोसावी ॥ ४ ॥ | ॥ १३५० ॥ नानलोनियां नामरूपा । येवढया वादविले संकल्पा ॥ १ ॥ न कळे याची माव कोणा । देवादैखां विचक्षणा ।। २ ॥ वेद श्रुति धांडो- ळितां । कार्य कारणा हि हा पुरता ॥ ३ ॥ निळा म्हणे हा अनुमाना । नये योगिया मुनिजना ॥ ४ ॥ | ॥ १३५१ ॥ आपणा दाउनी भुरळे केले । ठकुनी माझे मीपण नेले ॥ १ ॥ आतां जाऊ कोणाकडे । पळ तरी तो मागे पुढे ॥ २॥ धांबा म्हणोनी बोलों जाय । तंव वोलाते मिळुन आपणच ठाये ॥ ३ ॥ ऐक जाय पाच्या गोठी । तंव तो शब्दा पाठी पोट ।। ४ ।। देख जातां देखणे चि होर । दृश्योदृश्य हा नुरवीच माये ॥ ५॥ सुगंध घेतां आपण चि नाक । गंधाचा गंध हा चि एक ।। ६ ॥ मी माझे मन न दिसे चि कोडें । बहुता जुगाचे इरिले सांके ॥ ७ ॥ उकुनियां निळा अवघा चि नेला । सकळ ही त्याचे आपण चि झाला ॥ ८ ॥